Tuesday, August 25, 2026
Home बॉलीवूड Saqib Saleem B’Day: साकिब सलीम या प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाऊ, ‘८३’ चित्रपटातील अभिनयाने मिळाली ओळख

Saqib Saleem B’Day: साकिब सलीम या प्रसिद्ध अभिनेत्रीचा भाऊ, ‘८३’ चित्रपटातील अभिनयाने मिळाली ओळख

साकिब सलीम त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि चांगल्या लूकसाठी ओळखला जातो. त्याची बहीण हुमा कुरेशी ही एक उत्तम अभिनेत्री आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ’83’ चित्रपटात साकिब सलीमने मोहिंदर अमरनाथची भूमिका साकारली होती आणि यासाठी त्याचे खूप कौतुकही झाले होते. शनिवारी (8 एप्रिल) साकिब सलीम त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. हँडसम आणि क्यूट साकिब सलीम अनेकदा इंस्टाग्रामवर त्याचे शर्टलेस फोटो शेअर करत असतो.

साकिब सलीम एक फिटनेस फ्रीक आहे आणि तो त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये देखील दिसून येतो. ‘मुझसे दोस्ती करोगे’ या पहिल्याच चित्रपटात त्याने आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले. हुमा कुरेशीचा धाकटा भाऊ साकिब सलीम दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेट खेळायचा पण त्याच्या नशिबाला काही औरच मंजूर होतं आणि तो बॉलिवूडमध्ये आला. चित्रपटांव्यतिरिक्त, साकिब सलीम अनेकदा म्युझिक व्हिडिओ आणि अॅड फिल्म्समध्ये दिसतो.

साकिब सलीम विशेषत: फिटनेसबद्दल जागरूक आहे आणि अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या स्क्रीन प्रेझेन्समुळे त्याने प्रशंसा मिळवली आहे. यावर्षी ’83’ चित्रपटासाठी त्याचे विशेष कौतुक झाले. या चित्रपटात त्यांनी मोहिंदर अमरनाथची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली होती.

साकिब सलीम अनेकदा वेगवेगळ्या लूकमध्ये त्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. हँडसम हंक साकिब सलीमला त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते सोशल मीडियावर सतत शुभेच्छा देत आहेत.(saqib saleem celebrating 34th birthday today see actors sizzling shirtless pics)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘स्वतःवरचा विश्वास उडाला होता’ विद्या बालनने केले तिच्या आयुष्यातील ‘त्या’ भयानक काळाबद्दल भाष्य

पायाला पट्टी बांधलेली असतानाही विराट कोहली थिरकला शाहरुख खानसोबत, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा