Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सने आलियावर केला लाखोंच्या भेटवस्तूंचा वर्षाव, सिद्धार्थ मल्होत्रानेही दिले ‘हे’ खास गिफ्ट

रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्सने आलियावर केला लाखोंच्या भेटवस्तूंचा वर्षाव, सिद्धार्थ मल्होत्रानेही दिले ‘हे’ खास गिफ्ट

ज्या लग्नाची संपूर्ण सिनेसृष्टीला अनेक महिन्यांपासून आतुरता लागली होती. तो आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरचा (Ranbir kapoor)  विवाह सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. मुंबईच्या आर.के हाऊसमध्ये हा कार्यक्रम रंगला होता. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या लग्नाला उपस्थिती लावली होती. आता या नव्याने लग्न झालेल्या कपलवर शुभेच्छांसह भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे.  यामध्ये ज्यांच्यासोबत रणबीरचे प्रेमप्रकरण दिर्घकाळ चर्चेत राहिले त्या दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि कॅटरिना कैफनेही (Katrina Kaif)  महागड्या किंमतीच्या भेटवस्तू दिल्या आहेत. या भेटवस्तूंच्या किंमती ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल. जाणून घेऊया त्यांच्या याच महागड्या गिफ्टंची भलीमोठी यादी. 

बॉलिवूडचे क्युट कपल म्हणून रणबीर आणि आलियाच्या नावाची आता अधिकृतपणे नोंद झाली आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा रंगली होती. या चर्चांना पूर्णविराम देत दोघांनीही लग्नगाठ बांधली. त्यामुळे आलिया आता मिसेस कपूर म्हणून ओळखली जाणार आहे. लग्नानंतर अनेकांनी त्यांना महागडे गिफ्ट दिले आहेत. यामध्ये भट्ट फॅमिलीचा लाडका जावई झालेल्या रणबीरला आलियाची आई सोनी राजदानने ५० लाखांच घड्याळ गिफ्ट केले आहे तर आलियाचा एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राने तिला ३ लाखाची हॅंडबॅग गिफ्ट दिली आहे. आता यामध्ये रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड तरी कशा मागे राहतील.

रणबीरची कधीकाळीची गर्लफ्रेंड दीपिकानेही रणबीर आणि आलियाला महागडे घड्याळ गिफ्ट केली आहेत ज्याची किंमत १५ लाखाच्या आसपास आहे. तर कॅटरिना कैफनेही आलियाला १४ लाखाचे ब्रेसलेट गिफ्ट केले आहे. दीपिका आणि कॅटरिना दोघींसोबतही रणबीरचे दिर्घकाळ प्रेमप्रकरण गाजले होते. कॅटरिना आणि रणबीर लग्न करणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. तर अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबतही रणबीरचे नाव जोडले गेले होते. प्रियांकानेही आलियाला १५ लाखाचा नेकलेस गिफ्ट दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रणबीर आलियाची जुनी प्रेमप्रकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा