Tuesday, April 16, 2024

मुलींना इम्प्रेस करण्यासाठी जेव्हा संजय दत्त घ्यायचा ड्रग्स, लोकांनी पाडले होते ‘चरसी’ नाव

संजय दत्तचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘KGF Chapter २’ चित्रपट. हा चित्रपट खूप पसंत केला जात आहे. या चित्रपटात यश, रवीना टंडन आणि मालविका अविनाश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तामिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. संजय दत्तने याआधीही आपल्या

आता संजय दत्तने म्हटले आहे की, जेव्हा तो ड्रग्स घ्यायचा तेव्हा त्याला असे वाटायचे की लोक त्याला मस्त समजतील. संजय दत्त म्हणतो, “मी खूप लाजाळू होतो, विशेषत: मुलींना पाहून मला खूप लाज वाटायची. त्यामुळे मुलींसमोर मस्त दिसण्यासाठी मी ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा मुलींना मस्त वाटते आणि तुम्ही त्यांच्याशी बोलू लागता.”

संजय दत्त पुढे म्हणाला, “माझ्या आयुष्यातील १० वर्षे मी एकतर बाथरूममध्ये किंवा माझ्या खोलीत होतो. मला शूटिंगमध्ये अजिबात रस नव्हता. सर्व काही बदलले होते. मी पुनर्वसनातून परत आलो आणि लोक मला चरसी म्हणू लागले. मला वाटले ते चुकीचे आहे, ते बदलण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. मग मी जिम करायला सुरुवात केली. काही वर्षांनी लोक म्हणू लागले व्वा काय शरीर आहे.” संजय दत्त लवकरच ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा