कॅटरिना कैफ ते आमिर खानपर्यंत, ‘या’ कलाकारांनी घेतला होता चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय

प्रसिद्धीचे, पैसा मिळवण्याचे सर्वात मोठे क्षेत्र अशी हिंदी चित्रपट जगताची ओळख सांगितली जाते. या क्षेत्रात आलेले अनेकजण आपल्या कलेच्या जोरावर प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. या क्षेत्रात एकदा स्वतःला सिद्ध केले की नंतर मागे वळून पाहायची गरजच लागत नाही हीच या सिने जगताची जादू आहे. मात्र चित्रपट जगतात प्रसिद्ध होण्यासाठी संघर्षही तितकाच जोरदार करावा लागतो. अनेकांनी अगदी शून्यातुन सुरूवात करुन बॉलिवूडमध्ये यश मिळवले आहे. मात्र या जगतात यशाच्या शिखरावर असताना अनेकांनी आश्चर्यकारक रित्या निवृत्ती घेत सगळ्यांना धक्का दिला होता.  कोण आहेत हे कलाकार चला पाहूया.

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)
बॉलिवूडमध्ये असे अनेक सुपरस्टार्स आहेत, ज्यांची मुले इंडस्ट्रीत विशेष काही मिळवू शकली नाहीत. अभिषेक बच्चन देखील त्यापैकी एक आहे. अभिषेक बच्चनचे वडील अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे सुपरस्टार म्हटले जाते. वडिलांच्या स्टारडममुळे अभिषेकला अनेकवेळा तुलनेचा सामना करावा लागतो. एका मुलाखतीदरम्यान अभिषेक बच्चन म्हणाला होता की “मला वाटत होते की या इंडस्ट्रीत प्रवेश करणे ही माझी निवड आहे. यासाठी मी माझ्या वडिलांकडे गेलो आणि म्हणालो की कदाचित मी या इंडस्ट्रीसाठी योग्य नाही. त्यावेळी माझ्या वडिलांनीच मला योग्य तो सल्ला दिला होता.”

संजय मिश्रा (Sanjay Mishra)
संजय मिश्रा हे बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनीही मधेच चित्रपट जगत सोडण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा संजय मिश्रा यांनी फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी बॉलीवूड सोडले आणि ढाब्यावर काम करायला सुरुवात केली. यानंतर रोहित शेट्टीने त्यांना चित्रपट जगतात त्यांना संधी दिली.

आमिर खान (Aamir Khan)
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही अलिकडेच बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीदरम्यान आमिर खानने सांगितले होते की अभिनयाचा त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर खूप परिणाम होत आहे. मी अभिनय पूर्णपणे सोडून देईन, मी फक्त चित्रपटांची निर्मिती करेन, असे त्याने घरच्यांना सांगितले होते. हे ऐकून माझ्या कुटुंबीयांना धक्काच बसला,” असे तो म्हणाला होता.

कॅटरिना कैफ (Katrina Kaif)
कॅटरिना कैफचे नाव आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिनेही आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता . ही 2007 साली चित्रपट ‘नमस्ते लंडन’ प्रदर्शित झाला तेव्हाची गोष्ट आहे. एका चॅट शो दरम्यान कॅटरिना म्हणाली होती की “मी चित्रपट पाहिला, मला वाटले लोक मला चित्रपटात पाहू शकत नाहीत, त्यादरम्यान मला वाटले की मी माझे करिअर दुसर्‍या दिशेने करावे. म्हणूनच तिने चित्रपट जगत सोडण्याचा निर्णय घ्यावा वाटला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

Latest Post