Sunday, March 22, 2026
Home मराठी रिल्स बनवायला गेली अन मधेच…,सोनाली पाटीलच्या फजितीचा व्हिडिओ व्हायरल

रिल्स बनवायला गेली अन मधेच…,सोनाली पाटीलच्या फजितीचा व्हिडिओ व्हायरल

मराठी मनोरंजन जगतातील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयाप्रमाणेच सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्या अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असतात. सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये बिग बॉस फेम सोनाली पाटीलचे (Sonali Patil) नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती अनेक भन्नाट रिल्स बनवत असते. मात्र ह्याच रिल्स बनवण्याच्या नादात तिची चांगलीच फजिती झाली आहे ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, बिग बॉस ३ पासून सोनाली पाटीलच्या नावाची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. या कार्यक्रमात तिने सर्वांचेच लक्ष वेधले होते. या कार्यक्रमाने सोनालीला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर ती आता सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमी तिच्या डान्सचे रिल्स पोस्ट करत असते. सध्या तिचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रिल्स बनवताना तिची झालेली फजिती पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोनालीने पोस्ट केला असून त्यावर आता चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

सोनाली पाटीलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती रिल्स बनवण्यासाठी तयार होण्याआधीच गाणे लागल्याचे पाहायला मिळाले आहे. या प्रकारामुळे सोनालीची चांगलीच धांदल उडाली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत सोनालीने “सगळ्यांसमोर जेव्हा रिल करतो आणि काउंट न होता डायरेक्ट गाणं लागतं तेव्हा अशी फजिती होते.” असा गमतीदार कॅप्शन दिला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.  दरम्यान अभिनेत्री सोनाली पाटीलने ‘घाडगे अँड सून’, ‘देवमाणूस’, ‘वैजु नं १’ या मालिकेत काम केले आहे. यामध्ये तिच्या ‘देवमाणूस’ मालिकेतील भूमिकेचे कौतुक झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा