Wednesday, April 30, 2025
Home बॉलीवूड ऐश्वर्या रायने का धुडकवली होती ‘कुछ कुछ होता है’ची ऑफर? स्वतः सांगितले हैराण करणारे कारण

ऐश्वर्या रायने का धुडकवली होती ‘कुछ कुछ होता है’ची ऑफर? स्वतः सांगितले हैराण करणारे कारण

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट आणि अविस्मरणीय चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट या यादीत टॉपला येतो. शाहरुख खान (Shahrukh Khan), काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांनी करण जोहरच्या (Karan Johar) या १९९८च्या रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपटात दमदार अभिनय केला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर तर ठरला, सोबतच त्याने बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सर्व रेकॉर्ड मोडले. ‘कुछ कुछ होता है’चे अनेक सीन आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या जीभेवर आहेत.

या चित्रपटात टीनाची भूमिका साकारून राणी मुखर्जीही रातोरात स्टार बनली. मात्र या भूमिकेसाठी राणी मुखर्जी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. खरं तर, करण जोहरने ऐश्वर्या राय (Aishwarya Rai), ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि रवीना टंडनसह (Raveena Tandon) अनेक टॉप अभिनेत्रींना टीनाच्या भूमिकेची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी नकार दिला. शेवटच्या काळात ही भूमिका राणी मुखर्जीच्या पदरात पडली, जिचा तिच्या करिअरला मोठा फायदा झाला. (aishwarya rai revealed why she rejected karan johar movie kuch kuch hota hai)

ऐश्वर्याने सांगितले नकार देण्याचे कारण
ऐश्वर्याने हा प्रतिष्ठित चित्रपट का केला नाही, हे तुम्हाला माहीत आहे का? ‘कुछ कुछ होता है’ रिलीझ झाल्याच्या एका वर्षानंतर, अभिनेत्रीने चित्रपटात टीनाच्या भूमिकेला नकार देण्याचे कारण उघड केले होते. फिल्मफेअरला दिलेल्या थ्रोबॅक मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले होते की, त्यावेळी तिने फक्त तीनच चित्रपट केले होते आणि ती एका विचित्र परिस्थितीत होती. ती नवोदित असली, तरी तिची तुलना सर्वच ज्येष्ठ अभिनेत्रींशी होत असे.

ऐश्वर्या म्हणाली होती की, “जर मी हा चित्रपट केला तर मला असे सांगून टोमणे मारले जातील की, ‘बघा, ऐश्वर्या रायने तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांत जे केले, तेच करते आहे. जसे तिचे केस स्ट्रेट करणे, मिनी परिधान करून ग्लॅमरस स्टाईलमध्ये कॅमेर्‍यासमोर पोझ देणे.’ पण, चित्रपटात शेवटच्या टप्प्यात नायक मुख्य अभिनेत्रीकडे परत जातोच. मला माहीत आहे की, जर मी ‘कुछ कुछ होता है’ केला असता, तर मला विनाकारण खूप टीकेला सामोरे जावे लागले असते.”

तसेच भारत, मॉरिशस आणि स्कॉटलंडमध्ये चित्रित झालेला ‘कुछ कुछ होता है’ हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता.

ऐश्वर्या रायचे वर्कफ्रंट
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्या राय शेवटची २०१८ म्युझिकल फिल्म ‘फन्ने खान’मध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) आणि राजकुमार रावसोबत (Rajkumarr Rao) दिसली होती. अभिनेत्री ती लवकरच मणिरत्नमच्या आगामी ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा