×

जेव्हा प्रेमासाठी ऐश्वर्या रायने उचलले होते खतरनाक पाऊल, पाहून सासरे अमिताभ बच्चन देखील झाले होते अवाक्

हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्याने सिनेसृष्टीतील प्रत्येक अभिनेत्याला घायाळ केले आहे. या सुंदर अभिनेत्रींच्या यादीत बच्चन घराण्याची लाडकी सून म्हणून ओळखल्या जाणार्‍या ऐश्वर्या रायचा(Aishwarya Rai) पहिला नंबर लागतो. ऐश्वर्याच्या सौंदर्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते फिदा झाले होते. म्हणूनच तिचे नाव सलमान खानपासून अनेक दिग्गज अभिनेत्यांशी जोडले गेले आहे. ऐश्वर्याने अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे. यापैकी तिचा ‘खाकी’ चित्रपट सुपरहीट ठरला होता. याच चित्रपटातील एका सीनची आपण चर्चा करणार आहोत.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या अभिनय आणि सौंदर्याची व तिच्या चाहत्यांमध्ये खूप चर्चा असते. बॉलिवूडमध्ये जवळपास दोन दशकांपासून ऐश्वर्या रायने आपल्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या हृदयात स्थान कायम ठेवले आहे. आजही या अभिनेत्रीची लोकप्रियता पूर्वीपेक्षा कमी झालेली नाही. ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. त्याआधी ऐश्वर्याच्या एका चित्रपटाचा एक सीन नेहमीच चर्चेत असतो ज्यामध्ये ऐश्वर्या आपले प्रेम वाचवण्यासाठी धोकादायक पाऊल उचलते.

‘खाकी’ चित्रपटात ऐश्वर्या राय तिचे प्रेम म्हणजेच अजय देवगणला वाचवण्यासाठी अक्षय कुमारसोबत प्रेमाचे खोटे नाटक करते. त्याच वेळी, जेव्हा तिला तिच्या प्रियकराचा म्हणजेच अजय देवगणचा जीव वाचवणारा ठोस पुरावा मिळतो, तेव्हा ती अक्षय कुमारच्या पाठीत वार करते. मात्र ऐश्वर्या राय ज्याच्यावर प्रेम करते तो गुन्हेगार असून अक्षय कुमार या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

‘खाकी’ चित्रपटाच्या शेवटी सीनमध्ये ऐश्वर्या रायला पुरावे मिळताच तिने प्रियकराला वाचवण्यासाठी अक्षय कुमारच्या छातीवर गोळ्या झाडल्या. यामध्ये अक्षय कुमारचा मृत्यू होऊन जातो. अक्षय कुमारच्या निधनाने अमिताभ बच्चन हादरलेले असतात. अमिताभ बच्चन चित्रपटात डीसीपीच्या भूमिकेत असले, तरी ते अक्षय कुमारच्या खूप जवळचे आहेत. खाकी चित्रपटाव्यतिरिक्त ऐश्वर्या रायने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘देवदास’, ‘मोहब्बतें’, ‘राव जान’, ‘बंटी और बबली’, ‘जोश’, ‘गुजारिश’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवणारी ही अभिनेत्री शेवटची ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post