Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड भारतात सुपरहिट झाल्यानंतर आता परदेशातही धमाल उडवणार ‘द काश्मीर फाईल्स’, इस्राईलमध्ये होणार प्रदर्शित

भारतात सुपरहिट झाल्यानंतर आता परदेशातही धमाल उडवणार ‘द काश्मीर फाईल्स’, इस्राईलमध्ये होणार प्रदर्शित

मागच्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा तडाखा उडवला होता. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही चित्रपटावर स्तुतीसुमने उधळली गेली. ९० च्या दशकात काश्मीरमध्ये झालेल्या अमानुष अत्याचारावर हा सिनेमा भाष्य करतो. या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले तर अनेक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. आता याच सिनेमाशी संबंधित एक महत्वाची बातमी आली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खास माहिती सर्वांना सांगितली आहे. भारतात अमाप प्रेम आणि भरभरून कमाई केल्यानंतर हा सिनेमा आता परदेशातही धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. विवेक यांनी ट्विट करत लिहिले की, “प्रेक्षकांच्या मोठ्या मागणीचा आदर राखत ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा येत्या २८ एप्रिलला इस्राईलमध्ये प्रदर्शित होत आहे. मी चित्रपटाच्या उदघाटनासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या महावाणिज्य दूत कोब्बी शोशानी यांना धान्यवद म्हणू इच्छितो. आतंकवादाशी लढण्यासाठी आणि मानवतेला महत्व देणाऱ्या आमच्या ध्येयाला गाठण्याच्या प्रवासात एक मोठे पाऊल.”

तत्पूर्वी ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाला संपूर्ण देशात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींनी देखील या सिनेमाचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सिनेमाचे कौतुक करत हा सिनेमा पहाण्याचे आवाहन केले होते. या चित्रपटाला तर अनेक राज्यांनी टॅक्स फ्री केले होते. विवेक रंजन दिग्दर्शित हा सिनेमा ११ मार्च प्रदर्शित झाला होता. ९० च्या दशकात काश्मीरमध्ये जो नरसंहार झाला होता आणि त्यातून काश्मीर पंडितांनी पलायन केले होते त्यावर हा चित्रपट भाष्य करतो. सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. सिनेमाने तब्ब्ल २५० कोटींची घसघशीत कमाई केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा