Thursday, March 28, 2024

रवी शास्त्री यांच्यासोबत होता होता राहिले अमृता सिंगचे लग्न, अचानक समोर ठेवली भलतीच अट

बॉलिवूड जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा कथित प्रेमप्रकरणामुळेच जास्तीत जास्त चर्चेत राहिल्या. यामध्ये अभिनेत्री अमृता सिंगचे (Amrita Singh) नाव घेतले जाते. सैफ अली खानसोबत ( Saif Ali Khan)  विवाह केल्यानंतर अभिनेत्री अम्रिता सिंग चांगलीच चर्चेत आली होती. मात्र त्यांचा हा विवाह जास्त काळ टिकू शकला नाही आणि त्यांनी घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, अभिनेत्री अमृता सिंग सैफ अली खानच्या आधी क्रिकेटर रवी शास्त्री आणि विनोद खन्नासोबत रिलेशनमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. प्रेमप्रकरणाचा हा किस्सा चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री अमृता सिंगचे आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. अमृता केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही इंडस्ट्रीत खूप चर्चेत होती. सैफ अली खानसोबत लग्नापूर्वी अमृताचे नाव क्रिकेटर रवी शास्त्री आणि अभिनेता विनोद खन्ना यांच्यासोबत जोडले गेले होते. मात्र रवी शास्त्री आणि नंतर विनोद खन्नासोबतचे प्रेमप्रकरण जास्त दिवस टिकले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रवी शास्त्री आणि अमृता सिंग एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते आणि त्यांना लग्नही करायचे होते. मात्र, अमृतासोबत लग्नापूर्वी रवी शास्त्रीच्या एका अटीने त्यांचे नाते संपुष्टात आले.रवी शास्त्री यांची अट होती की, लग्नानंतर अमृता सिंगने चित्रपटात काम करू नये. मात्र, अमृताने ही अट मान्य केली नाही, त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघेही वेगळे झाले.

रवी शास्त्रीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अमृता सिंगच्या आयुष्यात अभिनेता विनोद खन्ना यांचाही प्रवेश झाला होता. ‘बटवारा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली होती, असे म्हटले जाते. मात्र, अमृता सिंगच्या आईला हे नाते मान्य नव्हते. वास्तविक विनोद खन्ना वयाने अमृता सिंगपेक्षा मोठे होते. त्यामुळे हे नाते ही फार काळ टिकू शकले नाही. शेवटी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. यांनंतर अमृता सिंग आणि सैफ अली खानने 1991 मध्ये लग्न झाले. मात्र, हे नातेही फार काळ टिकू शकले नाही. सैफ आणि अमृताचा 2004 मध्ये घटस्फोट झाला.(amrita singh affairs with vinod khanna and ravi shastri)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ फेम स्मृती इराणी यांचा हाेणारा जावई आहे तरी कोण? जाणून घ्या…
सिद्धार्थ, कियारा यांना शुभेच्छा देताना बॉलिवूडवर पुन्हा एकदा कंगनाने साधला निशाणा

हे देखील वाचा