Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड Troll | करीना कपूरची ज्वेलरी ऍड होतेय तुफान व्हायरल, मात्र ‘या’मुळे प्रचंड संतापले नेटकरी

Troll | करीना कपूरची ज्वेलरी ऍड होतेय तुफान व्हायरल, मात्र ‘या’मुळे प्रचंड संतापले नेटकरी

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ही कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि फोटो शेअर करून इंटरनेटवर आग लावते. पण कधी कधी करीना कपूर ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येते. यावेळीही असेच काहीसे घडले. करीना कपूर सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. अलीकडेच करीना कपूर एका ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीत दिसली. या जाहिरातीतील करीनाच्या लूकमुळे चाहते चांगलेच संतापलेले आहेत आणि तिला बरे वाईट ऐकावे लागत आहे.

काय आहे जाहिरात?
खरं तर, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ‘मलबार ग्रुप’ या ज्वेलरी ब्रँडने आपली नवीन जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये करीना कपूर पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. परंतु यात अभिनेत्रीने तिच्या कोणत्याही लूकमध्ये एकही टिकली लावलेली नाही. यामुळे सोशल मीडियावरील नेटकरी प्रचंड संतापले आहेत. ही जाहिरात पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. (kareena kapoor trolled for not wearing bindi in malabar gold ad)

नेटकऱ्यांनी ऐकवले बरे वाईट
करीना कपूरचा हा लूक सोशल मीडियावर युजर्सला अजिबात आवडला नाही. त्यामुळे मलबार ज्वेलर्सवर बहिष्कार टाकल्याची मागणी केली जात आहे. एवढेच नाही, तर ट्विटरवर युजर्स #Boycott_Malabar_Gold आणि #No_Bindi_No_Business या हॅशटॅगसह सतत ट्वीट करत आहेत. युजर्स म्हणत आहेत की, करीना कपूरने हिंदूंच्या जाहिरातीत एक टिकली का लावली नाही? एका युजरने लिहिले की, “तथाकथित जबाबदार ज्वेलर्स अक्षय तृतीयेसाठी जाहिरात रिलीझ करत आहेत आणि त्यात करीना कपूर टिकलीशिवाय आहे. ती हिंदू संस्कृतीचा आदर करते का? त्याचप्रमाणे इतर युजर्स करीना कपूर तसेच मलबार ग्रुपच्या मालकावरही निशाणा साधत आहेत.

करीना कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रिलीझ होत आहे. ज्यामध्ये करीनासोबत आमिर खान (Aamir Khan) देखील दिसणार आहे. याशिवाय करीना करण जोहरच्या (Karan Johar) आगामी ‘तख्त’ चित्रपटाचाही एक भाग आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा