Friday, December 1, 2023

वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी हरवले होते करीनाचे हृदय, प्रेमात आईविरुद्ध जाऊन केली होती ‘ही’ गोष्ट

करीना कपूर (Kareena Kapoor) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणार्‍या सौंदर्याने तिने स्वतःचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. अभिनेता सैफ अली खानसोबत (Saif Ali Khan) लग्न केल्यानंतर ती जास्त चित्रपटात झळकली नसली, तरी सोशल मीडियावर मात्र सतत सक्रिय असते. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला करीना कपूरशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत, जो तिच्या बालपणीच्या दिवसांशी संबंधित आहे. हा किस्सा खुद्द करीनाने एका मुलाखतीदरम्यान शेअर केला होता.

करीनाच्या म्हणण्यानुसार, ती लहानपणी खूप खोडकर होती आणि याच कारणामुळे तिची आई बबिता हिने तिच्यावर अनेक बंधने लादली होती. अभिनेत्रीने सांगितले होते की, तिची मोठी बहीण करिश्माला (Karishma Kapoor) मित्रमैत्रिणींसोबत हँग आउट करण्याची परवानगी होती, पण तिला तसे करण्यास मनाई होती. करीना सांगते की, वयाच्या १४-१५ व्या वर्षी तिला एक मुलगा खूप आवडत होता. मात्र, ही बाब तिची आई, बबिता यांना समजल्यानंतर त्या चांगल्याच संतापल्या. (kareena kapoor fell in love when she was in teenage and for this reason her mother was furious)

करीना त्या मुलाला भेटू नये म्हणून तिची आई त्यांच्या घरचा फोन स्वतः च्या खोलीत लपवून ठेवायची. अशा परिस्थितीत एके दिवशी आई घरी नसताना करी नाने चाकूच्या सहाय्याने आईच्या खोलीचे कुलूप तोडले आणि फोन घेतला. जेव्हा करीनाच्या आईला हे कळाले तेव्हा त्यांना खूप राग आला, त्यानंतर अभिनेत्रीला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना लवकरच आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ आणि करण जोहरच्या (Karan Johar) आगामी ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा