सध्या चित्रपटगृहांमध्ये दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ चित्रपट जोरदार धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाची पहिल्यपासूनच जगभरातील शिवप्रेमींना या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली होती. आता चित्रपटगृहात आल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपुर्व प्रतिसाद पाहायला मिळत असून, चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच कमाईचे अनेक रेकॉर्ड करत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने कोटींचा गल्ला जमवत इतर चित्रपटांना धोबीपछाड केले आहे.
‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ नंतर आता ‘शेर शिवराज’ चित्रपटाने सिनेमागृहे भरुन गेली आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या या चित्रपटांचे सर्वत्र कौतुक होत असून, चित्रपटाला शिवप्रेमींचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या बहुचर्चित चित्रपटात छत्रपती शिवरायांनी केलेल्या अफजल खान वधाची कथा दाखवली आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या (Chinmay Mandlekar) शिवरायांच्या भूमिकेने सर्वांचीच मने जिंकली आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत चित्रपटाने कोटींचा गल्ला जमा केला आहे. दिग्पाल लांजेकर यांनी सांगितल्या प्रमाणे ‘शेर शिवराज’ हे शिवरायांच्या चित्रपट मालिकेतील चौथे पुष्प आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटांचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
चित्रपटाचे ५०० हून अधिक शो हाऊसफुल आहेत. रिलीझनंतरच्या पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने कोटींचा गल्ला जमवला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘शेर शिवराज’च्या तीन दिवसांच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ‘शेर शिवराज’ने १.०५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी १.४५ कोटींचा बिझनेस केला, तर रविवारी १.७० कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाची तीन दिवसांची एकूण कमाई ४.२० कोटींवर पोहोचली आहे. ‘केजीएफ २’ आणि ‘जर्सी’ सारखे तगडे सिनेमे समोर असताना, ‘शेर शिवराज’ने तीन दिवसांत ४.२० कोटींची कमाई करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-