×

Lock Upp | फिनालेच्या आधी शोमधून बाहेर पडला लोकप्रिय स्पर्धक, चाहते निराश

सध्या कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) ‘लॉकअप’ कार्यक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाबद्दलचे अनेक किस्से वाद विवाद नेहमीच ऐकायला मिळत असतात. त्यामुळे या कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढताना पाहायला मिळते. कार्यक्रमातील सर्वात चर्चित स्पर्धक असलेल्या अली मर्चंटला (Ali Merchant)  नुकतेच घरातून बाहेर काढण्यात आले आहे, ज्याची माहिती कंगनाने दिली. या बातमीने त्याच्या चाहत्यांना आणि कार्यक्रमाच्या नियमित प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे. 

अभिनेता आणि डीजे अली मर्चंटचा ‘लॉक अप’वरील प्रवास अखेर संपला असून, त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. अली मर्चंटने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश केला होता. पण आता तो बाहेर पडला. शोची होस्ट, कंगना रणौत म्हणाली की, “इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्याचे योगदान खूपच कमी आहे. तो प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकला नाही.”

अली मर्चंटने या शोमध्ये अनेक गुपिते उघड केली. जसे की त्याने डीजे म्हणून कारकिर्दीची सुरुवात कशी केली आणि त्याचे लग्न कसे तुटले. त्याची पत्नी सारा खान, जी या शोचा एक भाग होती. तिने देखील अलीने आपली फसवणूक कशी केली याबद्दल अनेक खुलासे केले होते. या सगळ्या खुलाश्यामुळे आणि चर्चांमुळे कार्यक्रमात प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले होते. दरम्यान कंगनाचा लॉकअप कार्यक्रम ‘बिग बॉस’ या लोकप्रिय कार्यक्रमाप्रमाणे बनवण्यात आला होता. ओटीटी फ्लॅटफॉर्मवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाते.

प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माती एकता कपूरने या कार्यक्रमाची निर्मीती केली आहे. विविध क्षेत्रातील अनेक कलाकारांना आणि प्रसिद्ध व्यक्तींना या कार्यक्रमात सहभागी करण्यात आले होते. त्यामध्ये पूनम पांडे सारख्या अनेक विवादीत अभिनेत्रींनी हजेरी लावत रंगत आणली आहे. कार्यक्रमामध्ये नेहमीच सहभागी स्पर्धकांची जुगलबंदी पाहायला मिळत असते. पूनम पांडे  प्रमाणेच पायल रोहतगीही नेहमीच कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधताना दिसते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post