सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन चालू आहे. मनोरंजनविश्वातील एकामागोमाग एक असे अनेक कलाकार लग्न बंधनात अडकत आहे. याच लग्नाच्या सीझनमध्ये इतरही कलाकारांचे दोनचे चार हात व्हावे अशी अनेकांना इच्छा आहे. अशाच विभागातील कलाकार म्हणजे पुलकित सम्राट. मागील बरीच काळापासून पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा नात्यात असल्याच्या बातम्या येत आहे, अशातच नुकतेच पुलकीतला तो कृतीसोबत लग्न केव्हा करणार असे विचारले गेले. त्यावर त्याने दिलेले उत्तर मीडियामध्ये आणि त्यांच्या फॅन्समध्ये गाजत आहे.
पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा जवळपास तीन वर्षांपासून एकमेकाना डेट करत आहे. दोघांनी ‘वीरे की वेडिंग’, ‘तैश’, ‘पागलपंती’ आदी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र कम केले आहे. दोघेही नेहमीच मीडियासमोर त्यांच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य करतात मात्र लग्नाबद्दल त्यांचे विचार खूपच वेगळे आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पुलकित सम्राटाला लग्नाबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने सांगितले की, “माझा तर फंडा सिंपल आहे. जोपर्यंत तुम्ही बेअर फ्रेंडसारखे राहत असतात तोपर्यंत गोष्टी खूपच लवकर आणि सोप्या पद्धतीने नीट होतात.अशा प्रकारच्या तुमचे भांडण आणि प्रेम मित्रासारखे असते. जेव्हा लग्नाची गोष्ट येते तेव्हा ती दोन व्यक्तींमधील बॉंडिंग बदलून देते. जेव्हापर्यंत तुम्ही सर्वात चांगल्या मित्रांप्रमाणे आहेत तोपर्यंत गोष्टी सोप्या असतात. मग कशासाठी टेन्शन घ्यायचे. आम्ही दोघं एकमेकांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करत आहोत. मी आम्ही सोबत असण्यामुळे खुश आहे, आणि आम्हाला असेच राहायचे आहे.” यावरूनच पुलकित आणि कृतीच्या लग्नासाठी त्यांच्या फॅन्सला अजून वाट पाहावी लागणार आहे हेच जाणवत आहे.
सध्या पुलकित सम्राट ‘फुकरे ३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, यासोबतच तो ‘सुस्वागतम खुशमदीद’ सिनेमात दिसणार आहे. तर दुसरीकडे कृती यावर्षी मल्याळम इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार असून ती ‘अलोन’मध्ये मोहनलालसोबत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिना कैफने उघड केले तिचे टाेपण नाव; म्हणाली, सासऱ्यांनी दिले हे अनाेखे नाव
काय सांगता! कॅटरिनाने सलमानला शिकवला डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ