Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बहुप्रतिक्षेत अशा भूल भूलैया २ सिनेमातील टायटल ट्रक प्रदर्शित, कार्तिक आर्यनच्या डान्सने वेधले लक्ष

लवकरच बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा भूल भूलैया २ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. सिनेमाचा ट्रेलर पाहून आता प्रेक्षकांची चित्रपटाबद्दल उत्सुकता अधिकच वाढली आहे. अक्षय कुमारच्या सुपरहिट अशा भूल भूलैया या सिनेमाचा पुढचा भाग असलेल्या या सिनेमाने मागील बऱ्याच काळापासून बज तयार केला आहे. या ट्रेलरनंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती सिनेमाच्या गाण्यांची ही उत्सुकता अधिक न ताणता चित्रपटाच्या टीमने भूल भूलैया २ मधील पाहिले गाणे प्रदर्शित केले आहे.

भूल भूलैया २ सिनेमातील मुख्य अभिनेता असलेल्या कार्तिक आर्यनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सिनेमातील पाहिले टायटल ट्रक असलेले ‘हरे राम हरे राम’ या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच हे गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती देखील दिली आहे. या गाण्याचा व्हिडिओ शेअर करताना कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले, “रुह बाबांसोबत जिंगजंग स्टेप करा. भूल भूलैया २ सिनेमातील टायटल ट्रक प्रदर्शित.” यासोबतच त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे.

अक्षय कुमारच्या ‘भूल भुलैया’ सिनेमातील ‘हरे राम हरे कृष्णा’ या गाण्याशी हे नवीन प्रदर्शित झालेले गाणे अगदी मिळते जुळते आहे. यासोबतच गाण्याचे शब्द देखील जुन्या गाण्यातील शब्दांशी मिळते जुळते आहे. पहिल्या भागातील या ओरिजनल गाण्याला प्रीतमने संगीत दिले होते तर आता हे गाणे तनिष्क बागचीने रिक्रिएट केले आहे. तर गाण्याला प्रसिद्ध कोरिओग्राफर असणाऱ्या बॉस्को सिजरने कोरिओग्राफ केले आहे.

अनिस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 2’ हा सिनेमा २००७ साली आलेल्या अक्षय कुमारच्या भूल भुलैया सिनेमाचा रिमेक आहे. २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात कार्तिक आर्यनसोबत कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर पहिल्या भागात अक्षय कुमार, विद्या बालन, अमिषा पटेल, शायनी अहुजा, राजपाल यादव, विक्रम गोखले आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. आता हा सिनेमा पहिल्या भागासारख्या यशस्वी होतो की नाही हे २२ मे नंतर समजेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा