Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘कलाकाराच्या प्रतिभेवर अवलंबून’, म्हणत महेश बाबूच्या मानधनाच्या वक्तव्यावर दिग्दर्शक मुकेश भट्ट यांनी दिली प्रतिक्रिया

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या (Mahesh Babu) एका वक्तव्यामुळे सध्या बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. अलिकडेच एका चित्रपटाच्या ट्रेलर लॉंन्चिंग कार्यक्रमात बोलताना अभिनेता महेश बाबूने बॉलिवूडच्या दिग्दर्शकांना माझे मानधन परवडणार नाही असे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. महेश बाबूच्या या वक्तव्यावर बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांनी नाराजी व्यक्त करत त्याच्यावर जोरदार टिका केली आहे. आता या वादात प्रसिद्ध दिग्दर्शक मुकेश भट्ट (Mukesh Bhatt) यांनीही उडी घेत महेश बाबूच्या या वक्तव्याचा समाचार घेतला  आहे. 

महेश बाबूच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुकेश भट्ट म्हणाले की, “महेश बाबूच्या या वक्तव्यावर इतका गदारोळ करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. जर बॉलिवूडचे दिग्दर्शक त्याची फी देऊ शकत नाहीत तर ही चांगली गोष्ट आहे. मी त्याचे याबद्दल अभिनंदन करतो. तो ज्या भागातून येतो, त्याचा मी आदर करतो. तो एक प्रतिभावान अभिनेता आहे, त्याच्याकडे कला आहे आणि याच कलेच्या जोरावर त्याने स्वतःची एक किंमत तयार केली आहे. आणि त्यात काहीही वाईट नाही. त्याच्या प्रतिभेनुसार जर बॉलिवूड त्याला उचित मानधन देत नसेल तर त्यातही काही वाईट नाही.”

याबद्दल पुढे बोलताना ते म्हणाले की, “एखाद्याच्या खासगी मानधनावरुन आपण का नाराज व्हावे. जर मला एखाद्यासाठी फुकट काम करायची इच्छा असेल तर तो सर्वस्वी माझा निर्णय असेल. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की या क्षेत्रात काही फिक्स मानधन नसते. ते सर्व त्या कलाकाराच्या प्रतिभेवर अवलंबून आहे. विविध कारणांमुळे कलाकारांचे मानधन ठरलेले असते. हे त्यांच्या आणि दिग्दर्शकांच्या संबंधावर अवलंबून असते. त्यामुळे या कलाकारांच्या कलेचा आणि मानधनाचा मी आदर करतो.” दरम्यान या प्रकरणात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सह अभिनेता सुनील शेट्टीनेही आपले मत मांडले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा