Sunday, May 19, 2024

ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा चित्रपटातील किसिंग सीन पाहिल्यानंतर अशी होती नितू कपूर यांची प्रतिक्रिया

ऋषी कपूर (Rishi Kapoor) हे बॉलिवूड जगतातील सर्वात यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी ८०- ९० च्या दशकात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजही त्यांचे चित्रपट आणि त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. सिने जगतातील चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांच्या प्रेमप्रकरणाचीही त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती. पाहूया त्यांच्या प्रेमप्रकरणाचा हा गाजलेला किस्सा. 

अभिनेते ऋषी कपूर यांच्या चित्रपटांइतकीच त्यांच्या प्रेमप्रकरणाचेही अनेक किस्से आजही पाहायला मिळतात. यामध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी एकत्र काम करताना त्या दोघांमध्ये चांगलीच जवळीक वाढवली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. इतकेच नव्हेतर ऋषी कपूर डिंपल कपाडियासोबत लग्नही करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांचे हे प्रकरण राज कपूर यांना मान्य नव्हते त्यामुळे ऋषी कपूर यांनी डिंपल कपाडियापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर ऋषी कपूर यांनी नितू कपूर यांच्याशी तर डिंपल कपाडियाने सुपरस्टार राजेश खन्नासोबत विवाह केला.

लग्नानंतर काही  काळ सिने जगतापासून लांब गेलेल्या डिंपल कपाडियाने सागर चित्रपटातून पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटात पून्हा एकदा ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांची जोडी जमली होती. या चित्रपटात दोघांचा एक किसिंग सिनही दाखवण्यात आला होता. यामुळेच चित्रपटाच्या प्रिमियरवेळी ऋषी कपूर खूपच घाबरले होते. कारण त्यांच्यासोबत नितू कपूरही प्रिमिअरसाठी उपस्थित होत्या. हा किसिंग सिन पाहिल्यानंतर त्या काय बोलणार हाच विचार त्यांच्या मनात सारखा येत होता.मात्र नितू कपूर यांनी प्रिमियर पाहून झाल्यानंतर तुला किस जमला नाही अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या जिवात जिव आला. या  प्रकरणाची त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा