Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवल्याने तापलंय वातावरण, रवीना टंडनची ‘ती’ पोस्ट चर्चेत

ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवल्याने तापलंय वातावरण, रवीना टंडनची ‘ती’ पोस्ट चर्चेत

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. राज्यात भोंग्यावरून आणि अजानवरून जोरदार वाद सुरू असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत यावरूनच विरोधकांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर एआयएमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबादमध्ये इतर नेत्यांसह औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून त्यांच्यावर सर्व स्तरांंतून टिका होत असतानाच अभिनेत्री रविना टंडनने (Raveena Tandon) मात्र याबाबत ओवेसींचे समर्थन करणारे ट्वीट केले आहे. 

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन तिच्या चित्रपटांसह, चर्चेत असलेल्या विषयांवर केलेल्या प्रतिक्रियांसाठी ओळखली जाते. रवीना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने औरंगजेबाच्या मशिदीचे दर्शन घेतल्याप्रकरणी टीका होत असलेल्या ओवेंसीच्या वादात उडी घेत, असहिष्णू टोळीवर निशाणा साधला आहे. तिचे याबद्दलचे ट्वीट चांगलेच व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये रवीना टंडनने, “काही वेळापूर्वी माझ्या मातृभूमीला असहिष्णु असे लेबल लावण्याची फॅशन बनली होती. यावरून आपण किती सहिष्णू आहोत आणि किती सहन करू शकतो हे सिद्ध होते, हे उदाहरण आहे. असहिष्णुता कुठे आहे? आम्ही सहनशील प्रजाती आहोत, आहोत आणि राहणार आहोत. हा एक मुक्त देश आहे जिथे कोणाचीही पूजा करता येते. इथे सर्वांना समान अधिकार आहेत,” असे म्हणत ओवेसींचे समर्थन केले आहे. रवीनाने लेखक आनंद रंगनाथन यांचे ट्वीट रिट्वीट करताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

तत्पुर्वी लेखक आनंद रंगनाथन यांनी आपल्या ट्वीटमध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या ओवेसींचा फोटो शेअर करून औरंगजेबवर निशाणा साधला होता. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये “गुरू तेग बहादूर यांचा शिरच्छेद करणाऱ्या, संभाजी महाराजांचा वध करणाऱ्या, काशीला उद्ध्वस्त करणाऱ्या आणि ४.९ दशलक्ष हिंदूंना मारणाऱ्या राक्षसाच्या समाधीवर प्रार्थना करणे ही खळबळजनक कृती आहे,”असे म्हणत जोरदार टीका केली होती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रवीना टंडन अलीकडेच ‘KGF: Chapter 2’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली, हा चित्रपट अलीकडच्या काळातील सर्वात यशस्वी सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा