×

World Family Day 2022 | ‘स्वर्ग’पासून ते ‘संसार’पर्यंत, कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगतात ‘हे’ बॉलिवूड चित्रपट

कुटुंब हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सर्वात मजबूत आधारस्तंभ असतो. तुमचे कुटुंब आनंदी असेल, तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता, असेही म्हटले जाते. एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये फॅमिली ड्रामा चित्रपटांचा बोलबाला होता. जुन्या काळात असे अनेक फॅमिली ड्रामा चित्रपट बनले आहेत, जे आजही प्रेक्षकांना पाहायला आवडतात. आजही जेव्हा हे चित्रपट टीव्हीवर येतात, तेव्हा प्रेक्षक ते मोठ्या उत्सुकतेने पाहतात. आज जगभरात जागतिक कुटुंब दिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने जाणून घेऊया बॉलिवूडमधील काही लोकप्रिय फॅमिली ड्रामा चित्रपटांबद्दल. (watch these bollywood movies with family on world family day)

स्वर्ग
‘स्वर्ग’ हा डेव्हिड धवन दिग्दर्शित चित्रपट आहे. यात राजेश खन्ना (Rajesh Khanna), गोविंदा (Govinda), जुही चावला (Juhi Chawala) आणि माधवी (Madhavi) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा श्री कुमार, एक श्रीमंत व्यापारी, त्याची पत्नी, बहीण, दोन भाऊ आणि त्याची वहिनी यांच्याभोवती फिरते. हा चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता.

संसार
‘संसार’ हा टी. रामाराव दिग्दर्शित फॅमिली ड्रामा नाटक चित्रपट आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये अनुपम खेर (Anupam Kher), रेखा (Rekha), राज बब्बर (Raj Babbar), अरुणा इराणी (Aruna Irani), अर्चना जोगळेकर (Archana Joglekar) आणि शेखर सुमन (Shekhar Suman) यांचा समावेश आहे. चित्रपटाची कथा मुख्याध्यापक, त्याची पत्नी, त्याची तीन मुले आणि एक मुलगी यावर आधारित आहे. हा चित्रपट Zee5 वर उपलब्ध आहे.

बीवी हो तो ऐसी
‘बीवी हो तो ऐसी’ हा जेके बिहारी दिग्दर्शित एक बॉलिवूड ड्रामा चित्रपट आहे, ज्यात कादर खान (Kadar Khan) आणि बिंदू (Bindu) यांच्यासह रेखा, फारूख शेख (Farukh Sheikh) आणि सलमान खान (Salman Khan) यांनी भूमिका केल्या आहेत. चित्रपटाची कथा एका विवाहित जोडप्याभोवती फिरते. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर मोफत पाहू शकता.

घर हो तो ऐसा
‘घर हो तो ऐसा’ हा कल्पतरू दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात अनिल कपूर (Anil Kapoor) आणि मीनाक्षी शेषाद्री (Minakshi Sheshadri) मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा आपल्या समाजातील जिवंत वास्तव आणि विवाहित महिलांशी होणारी गैरवर्तणूक दाखवते. हा चित्रपट तुम्हाला Voot वर सहज सापडेल.

घर घर की कहानी
‘घर घर की कहानी’ हा देखील कल्पतरू दिग्दर्शित बॉलिवूड ड्रामा चित्रपट आहे. यात गोविंदा, फरहा नाज (Farha Naaz), ऋषी कपूर (Rishi Kapoor), कादर खान (Kadar Khan) आणि जयाप्रदा (Jaya Prada) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा आजच्या मालिकांसारखी साधी आहे. जर तुमच्याकडे जिओ सिम असेल, तर तुम्ही हा चित्रपट जिओ सिनेमावर मोफत पाहू शकता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post