कंगना रणौतच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘धाकड’ या सिनेमातील पाहिले गाणे चित्रपटाचे टायटल ट्रक ‘तू है धाकड़’ हे वाराणसी इथे गंगेच्या किनाऱ्यावर तरंगणाऱ्या एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याबद्दल सांगताना कंगना म्हणाली की, “आम्ही आमच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या शेवटच्या टप्प्यात ‘तू है धाकड़’ हे गाणे प्रदर्शित केले आहे. याचे कारण म्हणजे हे गाणे चित्रपटाच्या नावाला साजेसे ठरणारे आहे. हे गाणे एजेंट अग्नीला अजेय शक्तीच्या रूपात दाखवते. गाण्यात माझ्या भूमिकेचे धैर्य, क्षमता दाखवली गेली आहे.”
या गाण्याबद्दल बोलताना दिगदर्शक रजनीश घई यांनी सांगितले की, “मला एक असे गाणे पाहिजे होते ज्यात एक उत्साह पाहिजे होता. हे एक प्रेरणादायक गाणे असून, यातून एक भावना निर्माण होते की, सर्व समस्यांविरोधात सर्व गोष्टींना मिळवता येऊ शकते. कधीही अपराजय स्वीकारायला नको. हे गाणे एजेंट अग्नीच्या दृढतेला पूर्ण न्याय देते.” तर चित्रपटाचे निर्माते असणाऱ्या दीपक मुकुट यांनी सांगितले की, “‘तू है धाकड़’ हे गाणे एक प्रेरणादायी आणि वास्तवमध्ये चित्रपटाच्या थीम आणि कहाणीसाठी उपयुक्त आहे. हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो की, जो सिनेमा आम्ही मोठ्या कष्टाने बनवला त्याचे संगीत देखील त्याला एका उंचीवर नेत आहे.”
तत्पूर्वी कंगनाचा धाकड हा सिनेमा येत्या २० मे ला प्रदर्शित होत असून यात ती पहिल्यांदाच ऍक्शन करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- कान्स फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या तिच्या ड्रेसने लोकांना इंप्रेस करण्यात ठरली अपयशी, स्टायलिस्ट बदलण्याचा मिळाला सल्ला
- भारताने ऑस्करसाठी ‘हा’ चित्रपट पहिल्यांदा पाठवला होता, अवघ्या एका मताने हुकले होते विजेतेपद
- पहिल्या चित्रपटानंतरच कृष्णा अभिषेक झाला होता नैराश्याचा शिकार, कंटाळून पुन्हा एकदा वळला होता छोट्या पडद्याकडे