बॉलिवूडचा ‘भाईजान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानसोबत (Salman Khan) अनेक अभिनेत्रींनी पदार्पण केले आहे. त्यापैकी काही आज बॉलिवूडमध्ये मोठी नावं बनली आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला ज्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, ती सलमान खानसोबत ‘सनम बेवफा’ चित्रपटात दिसली होती. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री चांदनीबद्दल, जिचे खरे नाव नवोदिता शर्मा (Navodita Sharma) आहे. ‘सनम बेवफा’ हा त्या काळातील एक हिट चित्रपट होता, तरीही अभिनेत्री नवोदिता शर्माचे करिअर बॉलिवूडमध्ये जोर धरू शकले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वर्तमानपत्रातील जाहिरातीनंतर नवोदित शर्माची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली. खरं तर चित्रपट निर्माते सावन कुमार एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि त्यांनी वर्तमानपत्रात ही जाहिरात दिली होती. नवोदिताने ही जाहिरात पाहिली आणि ऑडिशन दिले. तिची चित्रपटात निवडही झाली. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता. (where is sanam bewafa actress navodita sharma who have worked with salman khan)
‘सनम बेवफा’ चित्रपटाच्या रिलीझनंतर, नवोदिताने ‘हिना’ (१९९१), ‘उमर ५५ की दिल बचपन का’ (१९९२), ‘जान से प्यारा’ (१९९२) सारख्या इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिने ‘१९४२: ए लव स्टोरी’ (१९९३), ‘जय किशन’ (१९९४), ‘इक्के पे इक्का’ (१९९४), ‘आजा सनम’ (१९९४), ‘मि. आझाद’ (१९९४), ‘हाहाकार’ (१९९६) इत्यादी चित्रपटांमध्येही काम केले होते, परंतु तिला अपेक्षित यश मिळू शकले नाही.
समोर आलेल्या बातम्यांनुसार, नवोदितने २०१६ मध्ये अमेरिकेत राहणाऱ्या सतीश शर्मासोबत लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवोदित आता अमेरिकेतील ओरलँडोमध्ये स्थायिक झाली आहे आणि तिथे एक डान्स अकादमी चालवते.
ैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा