Saturday, August 2, 2025
Home अन्य Cannes 2022 | अभिमानास्पद! कान्स महोत्सवात ‘या’ भारतीय चित्रपटाने जिंकले गोल्डन अवॉर्ड

Cannes 2022 | अभिमानास्पद! कान्स महोत्सवात ‘या’ भारतीय चित्रपटाने जिंकले गोल्डन अवॉर्ड

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ (Cannes Film Festival 2022) सध्या अंतिम टप्प्यात आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय सिनेतारकांसह चित्रपटांचाही दबदबा राहिला आहे. अलीकडेच, दिल्लीचे दिग्दर्शक शौनक सेन यांच्या ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ या माहितीपटाने कान्स २०२२ मध्ये गोल्डन अवॉर्ड जिंकला आहे. लघुपटात हे पारितोषिक पटकावल्यानंतर या चित्रपटाने आणि शौनकने देशाचे नाव रोशन केले आहे. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. 

‘ऑल दॅट ब्रेथ्स’ने सर्वांना केले प्रभावित
‘ऑल दॅट ब्रेथ्स’ हा चित्रपट कान्स २०२२च्या एक आठवडा आधी एचबीओ चॅनलवर प्रसारित झाला होता. यानंतर या लघुपटाने सर्वोत्कृष्ट आशय सादर करून सर्वांना प्रभावित केले. शॉर्ट फिल्म कॅटेगरीत गोल्डन आय अवॉर्ड मिळालेल्या या चित्रपटाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. गोल्डन आय ज्युरी सदस्य ऍग्निएस्का हॉलंड, इरिना त्सिल्क, पियरे डेलडोनचॅम्प्स आणि ऍलेक्स व्हिसेंट यांनी हा चित्रपट दिल्लीच्या प्रदूषणावर आधारित, एक उत्कृष्ट चित्रपट असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, विनाशाच्या जगात प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, असा संदेश देणारा हा चित्रपट आहे. किंबहुना एका पक्ष्याचा जीव वाचवण्यासोबतच दिल्लीच्या प्रदूषणात लोकांच्या दुरवस्थेचा दाखलाही या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. (indian director shaunak sen film all that breathes wins top documentary prize in 75th cannes 2020)

यापूर्वी पटकावलंय आंतरराष्ट्रीय विजेतेपद
या वर्षाच्या सुरुवातीला ‘ऑल दॅट ब्रेथ्स’ या डॉक्युमेंटरी फिल्मला फिलाडेल्फिया येथील वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर सनडान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणारा ही ९० मिनिटांची शॉर्ट फिल्म एकमेव हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या यशाचे श्रेय स्पष्टपणे शौनक शाने यांना जाते. त्यांनी एका अशा मुद्द्यावर हा चित्रपट बनवला आहे, जो रोजच्या जीवनातील सर्वात मोठे आव्हान आहे. दु:खद बाब म्हणजे, दिल्लीच्या प्रदूषणामुळे शौनकने वडिलांना गमावले होते. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा