मराठी मनोरंजनविश्वात सध्या ‘रानबाजार’ ही सिरीज तुफान गाजत आहे. सिरीजचा टिझर प्रदर्शित झाला आणि एकच धमाका झाला. सिरीजमध्ये असलेले बोल्ड सीन्स सगळीकडे चर्चेचा विषय बनला. कदाचित मराठीत पहिल्यांदाच एवढी बोल्ड सिरीज आली असावी असेच सगळ्यांना वाटत होते. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसिरीजचे सर्वात जास्त चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सिरीजमध्ये असलेले बोल्ड सीन्स. तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये प्राजक्ताचा अतिशय वेगळा आणि कधीही न पाहिलेला बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिरीजमध्ये प्राजक्ता खूपच वेगळी दिसली आहे. यामध्ये तिने रेड लाईट भागात राहणाऱ्या ‘रत्ना’ या एका वारांगणेची भूमिका साकारली आहे. ही भूमिका पडद्यावर उतरवणे प्राजक्तासाठी सर्वात मोठे आव्हान होते. या भूमिकेसाठी प्राजक्ताने शिव्या देखील शिकल्या वजन देखील वाढवले.
प्राजक्ताला जेव्हा पहिल्यांदा या सिरिजबद्दल सांगण्यात आले तेव्हा तिला ती स्क्रिप्ट खूपच आवडली मात्र समस्या होती. ‘रत्ना’ साकारायची कशी? रत्ना साकारण्यासाठी प्राजक्ताला स्वतःमध्ये अनेक बदल करावे लागणार होते. या सर्व गोष्टी करत असताना तिला एक टेन्शन कायम होते, ते म्हणजे प्रेक्षक तिला या भूमिकेत स्वीकारतील की नाही. या भूमिकेसाठी प्राजक्ताला तब्बल १५ किलो वजन वाढवायचे होते. तिला दिग्दर्शकांनी ६५ किलो वजन करायला लावले. यासाठी तिला बेढब दिसणे आवश्यक होते. अतिशय मेहनत करून राखलेला फिटनेस प्राजक्ताने गमावून ११ किलो वजन वाढवले.
या वेबसिरीजचे शूटिंग संपले आणि प्राजक्ताने पुन्हा तिचे वजन कमी करायला सुरुवात केली. आतापर्यंत तिने तिचे ७ किलो वजन कमी केले आहे. प्राजक्ताने नुकतीच याबाबत तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच तिने तिचा ‘रत्ना’च्या भूमिकेतला एक फोटो आणि आताच एक फोटो शेअर केला आहे. या दोन्ही फोटोमध्ये तिच्या वजनात असलेला फरक स्पष्ट दिसून येत आहे. या फोटोना शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “६१ किलो वजनावरून ५४ किलो… ‘रानबाजार’मधील रत्ना साकारण्यासाठी मी ११ किलो वजन वाढवले होते. सहा महिन्यांत नैसर्गिक पद्धतीने मी माझे वजन कमी केले. आता मी माझे ५१ किलो वजन करण्याचे लक्ष ठेवले आहे.”
प्राजक्ता नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून समोर येत असते. ‘जुळून येती रेशीमगाठी’ नंतर ती वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आली. या रान बाजार मधील भूमिकेवरून प्राजक्ताला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले, मात्र तिने देखील ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










