Thursday, November 30, 2023

अं’मली पदार्थ प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर काय आहे आर्यन खानचा प्लॅन? ‘या’ ठिकाणी होणार रवाना

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्रूझ अं’मली पदार्थ प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. या बातमीमुळे आर्यनच्या कुटुंबात आनंदाची लाट पसरली आहे. शुक्रवारी (२७ मे), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये १४ आरोपींची नावे आहेत. त्याचवेळी आर्यन खानला पुराव्याअभावी क्लीन चिट देण्यात आली आहे.

कामावर परतणार आर्यन खान
मिळालेल्या वृत्तानुसार, अं’मली पदार्थ प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यन खान आपल्या कामावर परतण्याचा विचार करत आहे. काही काळापूर्वी जामीन मिळाल्यानंतर तो वेब सीरिजमध्ये काम करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो अमेरिकेला रवाना होणार आहे. क्लीन चिट मिळाल्यानंतर आर्यनला त्याचा पासपोर्ट परत मिळेल, जो या प्रकरणात त्याच्या सहभागानंतर एनसीबीने जप्त केला होता. (aryan khan is going to us for a new show after getting clean chit by ncb)

एनसीबीने जप्त केला पासपोर्ट
अं’मली पदार्थ प्रकरणात नाव आल्यानंतर आर्यन खानला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते आणि तो देशाबाहेर जाऊ नये, म्हणून त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. मात्र, आता त्याला त्याचा पासपोर्ट परत मिळेल आणि त्यानंतर तो त्याच्या वेब सीरिजवर काम सुरू करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो ज्या वेब सीरिजवर काम करत आहे, त्याला लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवरून मंजुरी मिळाली आहे.

अमेरिकेला जाणार आर्यन खान
रिपोर्टमध्ये असेही सांगितले जात आहे की, आता आर्यन खान अमेरिकेला जाणार आहे आणि तेथे तो या वेब सीरिजवर काम करण्यासाठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि लेखकांकडून मार्गदर्शन घेणार आहे. यापूर्वी अशी बातमी आली होती की, आर्यन खानने त्याच्या शोसाठी टेस्ट शूट केले होते, ज्यामध्ये अनेक लोक उपस्थित होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा