Thursday, April 25, 2024

अं’मली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला मिळाली ‘क्लीन चिट’; वानखेडे म्हणाले, ‘माफ करा, मी…’

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबई अं’मली पदार्थ प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. पोलिसांच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नाव नाहीये. शुक्रवारी (२७ मे), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) या प्रकरणात ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये १४ आरोपींची नावे आहेत. गेल्या वर्षी मुंबईत एका क्रूझ जहाजावर अं’मली पदार्थ प्रकरणात यांना अटक करण्यात आली होती.

एनसीबीने केली होती आर्यनला अटक
एनसीबीच्या छापेमारीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला आरोपी ठरवण्यात आले. वरिष्ठ एजन्सी अधिकारी संजय कुमार सिंग यांनी सांगितले की, एनसीबीला आर्यन खान आणि इतर पाच लोकांविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. ते म्हणाले, “आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडे नशीला पदार्थ आढळून आला. एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमान्वये १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” (Sameer Wankhede reaction after Aryan Khan cleared in drugs bust case)

तसेच आर्यन खानला अटक करणारे माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी याबतीत कमेंट करणे टाळले. याबाबत विचारले असता ते म्हणाले, “माफ करा, मी कमेंट करू शकत नाही. मी एनसीबीमध्ये नाही, एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोला.”

३ ऑक्टोबर २०२१ रोजी, आर्यन खानला एनसीबीने क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी अटक केली होती. सुमारे २८ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा