Saturday, March 15, 2025
Home साऊथ सिनेमा लैंगिक शोषण प्रकरण: कोर्टाच्या निर्णयानंतर दुबईहून कोचीला पोहोचला अभिनेता विजय बाबू ,चौकशीला सहकार्य करण्याचे आश्वासन

लैंगिक शोषण प्रकरण: कोर्टाच्या निर्णयानंतर दुबईहून कोचीला पोहोचला अभिनेता विजय बाबू ,चौकशीला सहकार्य करण्याचे आश्वासन

मल्याळम अभिनेता आणि निर्माता विजय बाबू (Vijay babu) लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चांगलाच अडचणीत आला आहे. हे आरोप झाल्यानंतर तो तात्काळ दुबईहून कोचीला पोहोचला . त्याचे कोची विमानतळावरील फोटोही समोर आले आहेत. या प्रकरणावर केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी त्याला 2 जूनपर्यंत अटकेपासून दिलासा देत या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. कोची विमानतळावर आल्यानंतर विजय बाबूने प्रसारमाध्यमांना माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आणि आपण पोलिसांना पूर्ण सहकार्य करू आणि सत्य सर्वांसमोर येईल, असे आश्वासन दिल्याचेही वृत्त समोर आले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की मल्याळम अभिनेता आणि दिग्दर्शक विजय बाबूंवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्यानंतर त्यांना पोलिसांनी यापूर्वी राज्यात परतण्यास सांगितले होते, ज्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. अटकेवरून तात्पुरती सुनावणी करताना एकल खंडपीठाचे न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांनी ‘जर मी आता अंतिम जामीन नाकारला, तर तो पुढे परदेशात बेपत्ता होईल. आपल्या देशात असे किती लोक बेपत्ता आहेत? अनेक यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत, पण त्यांना यश आले नाही? हेच मी इथे टाळण्याचा प्रयत्न करत आहे.” असे सांगत विजय बाबूच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर 2 जून रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले होते.

अभिनेता आणि निर्माता विजय बाबू यांच्याविरोधात २२ एप्रिल रोजी लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाच दिवसांनंतर, फेसबुक लाईव्ह दरम्यान पीडितेची ओळख उघड केल्याबद्दल त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो दुबईला रवाना झाला होता. त्याचवेळी त्यांनी या प्रकरणाबाबत फेसबुकवर लाइव्ह आला येत स्वतःला पीडित असल्याचा दावा केला आणि काही स्क्रीनशॉट्स दाखवणार असल्याचे सांगितले होते.

हे देखील वाचा