Tuesday, January 13, 2026
Home बॉलीवूड वरुण आणि कियाराला एक वडापाव पडला महागात, नेटकऱ्यांनी धरले धारेवर

वरुण आणि कियाराला एक वडापाव पडला महागात, नेटकऱ्यांनी धरले धारेवर

कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्यांच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. अशातच या दोघांनी मुंबईच्या मेट्रोमध्ये प्रवास केला आणि यावेळी त्यांच्यासोबत अभिनेते अनिल कपूरही (Anil Kapoor) दिसले. मेट्रोमध्ये स्वार होत असताना तिन्ही कलाकार फोटो क्लिक करताना दिसले. मात्र त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर यूजर्स त्यांच्यावर रागावताना दिसत आहेत.

मुंबई मेट्रोमध्ये वडा पाव खाताना दिसले कियारा वरुण
पॅपराझी पेजवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, कियारा आणि वरुण मेट्रोमध्ये वडा पाव खाताना दिसत आहेत. मात्र मेट्रोमध्ये जेवणाला परवानगी नाही, हेही सर्वांना माहित आहे. याविषयी युजर्स सोशल मीडियावर त्यांना खरे-खोटे ऐकवत आहेत, नियमांची आठवण करून देत आहेत, तसेच मेट्रो प्रशासनालाही प्रश्न विचारत आहेत. अखेर मेट्रोमध्ये सामान्य जनता जेवू शकत नाही, मग स्टार्सना व्हीआयपी ट्रिटमेंट कशासाठी? असा सवाल अनेक युजर्स करत आहेत. (varun dhawan kiara advani trolled after eating inside mumbai metro)

कियारा आणि वरुणचा हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, “नियम फक्त आमच्यासाठी बनवले जातात. या लोकांना कशाचीही परवानगी आहे.” त्याचप्रमाणे आणखी एका युजरने असेही लिहिले की, “खाण्याची परवानगी नाहीये, व्हीआयपी ट्रीटमेंट!” त्याचप्रमाणे दुसर्‍याने लिहिले की, “लोक अन्न खाऊ शकत नाही, परंतु या नायक नायिकांना सर्वकाही परवानगी आहे.” बाकीचे युजर्सही अशाच पद्धतीने आपली प्रतिक्रिया देताना आणि दंड आकारण्याची मागणी करताना दिसले.

लवकरच प्रदर्शित होणार चित्रपट
या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर कियारा, वरुण आणि अनिल कपूर यांच्याशिवाय नीतू कपूरही (Neetu Kapoor) ‘जुग जुग जिओ’मध्ये दिसणार आहे. चित्रपटात रोमान्स असला तरी, हा कौटुंबिक मनोरंजन करणारा असल्याचे बोलले जात आहे. राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट २४ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा