Wednesday, October 15, 2025
Home टेलिव्हिजन तीनशे कोटींच्या बजेटमध्ये बनणार ‘शक्तिमान’; मुकेश खन्ना म्हणाले, ‘…शक्य नाही’

तीनशे कोटींच्या बजेटमध्ये बनणार ‘शक्तिमान’; मुकेश खन्ना म्हणाले, ‘…शक्य नाही’

सुपरहिरोवर आधारित शो ‘शक्तिमान’ हा ९०च्या दशकातील मुलांचा सर्वात आवडता शो होता, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. डीडी नॅशनलवर १९९७मध्ये सुरू झालेला हा शो पाहण्यासाठी, त्या काळात मुलं वेळेच्या आधीच टीव्हीसमोर बसायची. ९०च्या दशकातील मुलांसाठी हे नाटक नसून, त्यांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत, असे म्हणता येईल. आता १७ वर्षांनंतर ही मालिका पुन्हा एकदा चित्रपटाच्या रूपात पाहायला मिळणार आहे.

या शोमध्ये ‘शक्तिमान’ची भूमिका साकारणाऱ्या मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी नुकतीच ‘सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रॉडक्शन’सोबत चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती आणि आता अभिनेते त्याच्या बजेटबद्दल बोलले आहेत. त्याचवेळी त्यांनी असाही खुलासा केला की, लोक त्यांना म्हणतात की, ‘शक्तिमान’चा दुसरा भागही आणा. आता मुकेश खन्ना यांनी एका मीडिया वेबसाईटला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत या सगळ्यांबद्दल सांगितले आहे. (mukesh khanna talked about his film shaktimaan budget and its character)

३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला जाणार ‘शक्तीमान’
मुकेश खन्ना म्हणाले, “माझ्याकडे अनेक वर्षांनी हा प्रकल्प आला आहे. लोक मला शक्तीमान २ बनवायला सांगायचे. पण मला शक्तीमानला पुन्हा टीव्हीवर आणायचे नव्हते. संभाषणानंतर मी सोनीच्या टीमशी हस्तांदोलन केले आणि नंतर ही बातमी सार्वजनिक केली. लोकांना जाणून घ्यायचे आहे, पुढे काय होत आहे? आता त्यांना काय सांगू? हा किमान ३०० कोटींचा मोठा चित्रपट आहे. सर्वकाही अंतिम होईपर्यंत याबद्दल अधिक काही सांगू शकत नाही.”

कोण बनणार शक्तीमान?
मुकेश यांनी सांगितले की, ३०० कोटींचा हा बिग बजेट चित्रपट बनण्यास वेळ लागेल, पण हा चित्रपट देसी संकल्पनेवर आधारित असेल. ते म्हणाले, “हा चित्रपट स्पायडर मॅनचे निर्माते बनवत असतील, पण शक्तीमान देशीच असेल. चित्रपटाची कथा मी माझ्या पद्धतीने तयार केली आहे. माझी त्यांच्याशी एकच अट होती की, ते कथा बदलणार नाहीत. लोक विचारत आहेत, कोण होणार शक्तीमान? हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर मी देणार नाही, पण मुकेश खन्नाशिवाय शक्तीमान होणार नाही हेही निश्चित. कारण दुसरा कोणी शक्तिशाली झाला, तर संपूर्ण देश ते मान्य करणार नाही.”

महत्त्वाची बाब म्हणजे, ‘शक्तिमान’ची निर्मिती मुकेश खन्ना यांनीच केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा