Friday, April 19, 2024

गो हत्येवर भडकले अभिनेते मुकेश खन्ना; म्हणाले, ‘वाघाला नाही, तर गाईला…’

भारतामध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. यामुळे राजकारण्यांपासून ते कलाकारांपर्यत सर्वच जण एखाद्या गंभीर विषयावर आपले मत हमखास मांडत असतात. अशात ‘शक्तिमान’ बनून लहान मुलांच्या मनामध्ये प्रेरणेचे स्थान निर्माण करणारे अभिनेते मुकेश खन्ना हे दिखील चालू घडामोडींवर स्वतःचे मत व्यक्त करत असतात. अशात त्यांनी गो हत्येवर आधारित एक वक्तव्य केले आहे. त्यांनी एका व्हिडिओमध्ये गाईचे महत्त्व सांगत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये ते गाईंची हत्या करणाऱ्यांवर भडकले असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, “आपल्या घरामध्ये असलेल्या महिलांवर कोणी अन्याय अत्याचार करत असेल, तर आपण काय बघत बसतो का? राहूदे पोलीस येतील, तेव्हा ते बघतील काय करायचे ते,असं म्हणतो का? नाही ना, मग गाय ही, तर आपली माता आहे. तुम्ही कसे काय तिला खाता. काही लोक, तर तिचा व्यापार करतात. लाखो रुपयांसाठी गायींना विकतात. काही परक्या देशातील लोक तिकडूनच गाईचे मांस खाऊन येतात. त्यामुळे ते म्हणतात की, आम्हाला ते लागतेच. आम्हाला सवय आहे. लाज वाटली पाहिजे, अशा लोकांना.”

पुढे ते सरकारला आवाहन करत म्हणतात की, “वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आणि मोर राष्ट्रीय पक्षी आहे. मी सरकारला विंनती करतो की, त्यांनी वाघाला नाही, तर गाईला राष्ट्रीय प्राणी बनवले पाहिजे. वाघ हा स्वतःची रक्षा करण्यासाठी सक्षम आहे. गाय तशी नाही त्यामुळे तिला राष्ट्रीय प्राणी बनवले, तर लोक तिला खाणार नाहीत तिचा जीव घेणार नाहीत.”

त्यांनी पुढे गाईच्या पोटात ३३ कोटी देव आहेत, असा उल्लेख करत गाईचे वैज्ञानिक महत्त्व देखील सांगितले, “गायीच्या पोटामध्ये ३३ कोटी देव आहेत. गाईपासून दूध, गोमूत्र आणि शेण मिळते. या सर्व गोष्टी मानवाच्या खूप उपयोगाच्या आहेत. त्यामुळे कृपया तिला खाऊ नका.”

त्यांच्या या वक्तव्याचे अनेक हिंदू धर्मियांनी समर्थन केले, तर काहींनी यावर टीका केली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थ शुक्लानंतर ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्याचा मृत्यू, नुकताच इजिप्तमध्ये गेला होता ट्रीपला

-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन

-‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा

हे देखील वाचा