सोशल मीडियावर ‘शक्तिमान’ मुकेश खन्ना यांच्या निधनाची अफवा; अभिनेते म्हणाले…

Mukesh Khanna clears rumours of his death and says I am perfectly all right


‘महाभारत’ आणि ‘शक्तिमान’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे अभिनेते म्हणजे मुकेश खन्ना. त्यांनी त्याच्या अभिनयाने सर्वांना वेड लावले होते. अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळेच त्यांच्या मालिका खूप आवडीने पाहत होते. त्यांच्या शक्तिमान या मालिकेने तर घराघरातील लहान मुलगा त्यांचा चाहता होता. सध्या सोशल मीडियावर मुकेश खन्ना यांच्या निधनाच्या अफवा पसरत आहेत. परंतु ते एकदम ठीक असल्याची बातमी त्यांनी दिली आहे.

सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची अफवा पसरल्यानंतर नवभारत टाईम्स ऑनलाईनने मुकेश यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी फोनवर बोलताना मुकेश खन्ना यांनी सांगितले की, “मी एकदम ठीक आहे. मला माहित नाही ही अफवा कोणी पसरवली आहे. मला अनेक जणांचे फोन आले आहेत.”

त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून सांगितले की, “मी हे सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो आहे की, मी एकदम ठीक आहे. मी त्या सगळ्या अफवांचे खंडन करत आहे. सोशल मीडियाची हीच समस्या आहे की, लोक पडताळणी न करता लगेच बातमी पसरवतात. माझ्या सोबत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आहेत. ज्याच्यासोबत तुमचे आशीर्वाद आहेत, त्याला कसे काय होऊ शकते. तुम्ही सर्वांनी माझी एवढी काळजी केली त्याबद्दल धन्यवाद.”

मुकेश खन्ना यांचे मोठे भाऊ सतीश खन्ना यांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला. सतीश खन्ना हे 84 वर्षाचे होते. ते एक बिसनेसमॅन होते, अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अभिनेत्री बनूनही रिंकू राजगुरूने आजपर्यंत केले नाही ‘हे’ काम; तुम्हीही म्हणाल, ‘हे कसं काय बरं!’

-लय भारी! भर उन्हात घराबाहेर पॅपराजींना कोल्ड ड्रिंक पाजताना दिसला सोनू सूद, पंतप्रधान बनण्याच्या प्रश्नावर दिली अशी प्रतिक्रिया

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?


Leave A Reply

Your email address will not be published.