मुलाला सांभाळणं तसं कठीणंच काम. त्यातही नेहमीच आईला बरचंस श्रेय मिळतं, पण बाबांना तेवढं मिळताना दिसत नाही. आई श्रेष्ठ असतेच, पण बाबांचही योगदान नाकारण्यासारखं नसतंच मुळात. पण कितीही झालं तरी मुलांच संगोपण करणे अवघडच, त्यातही जर सिंगल पँरेंट असेल, हे काम अधिक कठीण होऊन बसतं. पण असेही काहीजण आहे, ज्यांनी सिंगल पँरेंट होण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले. यात काही सिंगल डॅडही आहेत बरं का. तसंही आता हळूहळू समाजाने सिंगल मदर प्रमाणेच सिंगल डॅडलाही स्विकारायला सुरुवात केलीये. भारतीय सिनेसृष्टीतही असे काही सेलिब्रेटी आहेत, जे सिंगल डॅड आहेत. तर मंडळी आपल्या व्हिडिओचा विषयच हा आहे.
या यादीत पहिलं नाव येतं तुषार कपूर (Tushar Kapoor). गोलमाल फेम तुषार कपूर हा एक सिंगल डॅड आहे. त्याने आत्तापर्यंत लग्न केलेले नाही, पण त्याने असे असले तरी पालक होण्याचा निर्णय घेतलेला. 2016 मध्ये सरोगसी मार्फत तुषारने त्याचा मुलगा लक्ष्यच्या जन्माचे स्वागत केले होते. तेव्हा पासून तो लक्ष्यची काळजी घेत असून अनेकदा त्याच्याबरोबरच क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने बॅचलर डॅड हे पुस्तकही लिहिले आहे.
तुषारप्रमाणेच दिग्दर्शक निर्माता करण जोहरही (Karan Johar) सिंगल डॅड आहे. बॉलिवूडमध्ये करणचं मोठं नाव असून त्याच्याकडे बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा फदर फिगर म्हणून पाहीलं जातं. पण तो खऱ्या आयुष्यातही यश आणि रुही या जुळ्या मुलांचा बाबा आहे. त्याचंही अद्याप लग्न झालेलं नाही, त्यामुळे त्याने बाबा होण्यासाठी सरोगसीचा मार्ग निवडला. त्यातून तो 2017मध्ये बाबा झाला असून हा त्याच्यासाठी वेगळा आणि खूप आनंद देणारा आनंद असल्याचे तो म्हणतो. तो त्याच्या दोन्ही मुलांना त्याच्या आईच्या मदतीने मोठे करत आहे.
खलनायक म्हणून अनेक भूमिका रंगवलेला राहुल देव खऱ्या आयुष्यात मात्र त्याच्या मुलासाठी हिरो ठरलाय, असं आपण म्हणू शकतो. त्याने त्याच्या आयुष्याचा जोडीदार म्हणून रिना देवला निवडले होते. त्याने रिनाबरोबर 1998 मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगाही झाला, ज्याचं नाव सिद्धार्थ आहे. पण लग्नाच्या 11 वर्षांनंतर रिनाचे कर्करोगाशी लढा देताना निधन झाले. त्यामुळे सिद्धार्थला सांभाळण्याची जबाबदारी एकट्या राहुल देववर आली होती. राहुलनेही ही जबाबदारी समर्थपण सांभाळली. त्याने काहीवर्षे यासाठी ऍक्टिंगमधून ब्रेकही घेतला होता. सध्या राहुल मुग्धा गोडसेबरोबर रिलेशनशीपमध्ये आहे. पण असे असले तरी तो त्याच्या मुलाकडे पूर्ण लक्ष देत असतो.
एकिकडे बाबा बनण्यासाठी करण जोहर आणि तुषार कपूर यांनी सरोगसीचा पर्याय निवडलेला असताना दुसरीकडे राहुल बोसने मात्र दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्याला बॉलिवूडमधील वर्साटाईल ऍक्टर मानले जाते. तो केवळ चांगला अभिनेताच नाही, तर दिग्दर्शक, लेखकही आहे. त्याने 2007 मध्ये अंदमान आणि निरोबार बेटांमधून 6 मुलांना दत्तक घेतले होते.
या यादीत कमल हसनही असून तो 2004 मध्ये सारिकापासून वेगळा झाला होता. पण त्यांना श्रृती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. पण सारिकापासून वेगळे झाल्यानंतरही कमल हसनने त्याच्या दोन्ही मुलींना सांभाळले. चंद्रचूड सिंगही कमल हसनप्रमाणेच सिंगल डॅड आहे. अनेक रिपोर्टप्रमाणे तो त्याच्या बायकोपासून वेगळा झाल्यानंतर त्याने त्याचा मुलगा शरणजय सिंग याला सांभाळले आहे. (single dads of bollywood)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
करीना कपूरसोबत केली होती अभिनयाची सुरुवात, तर ‘असा’ होता तुषार कपूरच्या कारकिर्दीचा आलेख
तबस्सुम थाटात जगत होत्या आयुष्य, एवढ्या कोटींची संपत्ती ठेवली राखूण