Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड Viral Video: कारच्या छतावर नीतू कपूर यांचा जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले ‘ऋषी कपूर असते तर..’

Viral Video: कारच्या छतावर नीतू कपूर यांचा जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले ‘ऋषी कपूर असते तर..’

‘दीवार, याराना’, ‘दो दूनी चार’, ‘यादों की बारात’, ‘अमर अखबर अँथनी’, ‘खेल-खेल में’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर सुमारे 9 वर्षांच्या दीर्घ ब्रेकनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. अनिल कपूर(Anil Kapoor) कियारा अडवाणी (Kiara Advani), वरुण धवन (Varun Dhawan) आणि मनीष पॉलसोबत त्या ‘जुगजुग जीयो’ या चित्रपटात दिसणार आहेत, ज्यासाठी त्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आजकाल नीतू ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या डान्स रिअलिटी शोला जज करत आहेत, या कार्यक्रमाच्या सेटवर जुग जुग जियोच्या संपूर्ण टीमने जोरदार प्रमोशन केले. सध्या या कार्यक्रमातील व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. 

नितू कपूर यांच्या जुगजुग जियो चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अनिल कपूर, कियारा अडवाणी, वरुण धवन अशी दिग्गज कलाकार मंडळी या चित्रपटात झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाची संपूर्ण टीम डान्स दिवाने ज्युनिअर्स च्या सेटवर प्रमोशनसाठी आली होती. यावेळी सर्वच कलाकारांनी चांगलीच धमाल उडवून दिलेली पाहायला मिळाली.डान्स दिवाने ज्युनियर्सच्या सेटवर शम्मी कपूरच्या हिट गाण्यावर कारच्या छतावर डान्स करून नीतू कपूर यांनी लोकांना थक्क केले. त्यांनी कार्यक्रमाचे  दुसरे जज मारझी पेस्टोनजी यांच्यासोबत डान्स केला, जो लोकांना खूप आवडला.

व्हिडीओमध्ये नीतू आणि मर्झी दोघेही कारच्या छतावर उभ्या असलेल्या आणि गाण्याची धून वाजताच नाचू लागल्याचे दिसत आहे. दोघांनी मोहम्मद रफीच्या ‘ओ हसीना जुल्फों वाली जाने जहाँ’ या गाण्यावर डान्स केला आहे. हे गाणे 1966 मध्ये आलेल्या ‘तीसरी मंझिल’ या अभिनेते शम्मी कपूर आणि हेलन यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. व्हिडिओमध्ये नीतू कपूर आणि मारझी पेस्टनजी कारच्या छतावर शम्मी कपूर आणि हेलन यांच्याप्रमाणे नाचताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा