Sunday, December 3, 2023

Birthday Special | राणीप्रमाणे आयुष्य जगते काजल अग्रवाल, तब्बल ‘इतकं’ आहे अभिनेत्रीचं नेटवर्थ

तामिळ, तेलुगू आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करणारी काजल अग्रवाल हिला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही. काजलने तिच्या करीयरची सुरुवात 2004मध्ये केली आणि 2009मध्ये आलेल्या ‘मगाधीरा’ या तेलुगू चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. नंतर तिने ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटातून तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली. तसेच 2021मध्ये काजलने इंटेरिअर डिझायनर गौतम किचलू याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. अशात आज म्हणजे साेमवारी (19 जुन)ला अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला, तर यानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्रीच्या नेटवर्थबद्दल…

काजल सध्या तिच्या गरोदरपणाच्या दिवसांचा आनंद घेत आहे. तिचे नाव दाक्षिणात्य इंडिस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. बॉलिवूडमध्ये सुद्धा काजलने तिच्या अभिनयाने चांगलीच धमाल केली. अभिनेत्रीला ‘लेडी सिंघम’ही म्हणतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, हीच लेडी सिंघम तिच्या खऱ्या आयुष्यात एकदम राजकन्येप्रमाणे जगते. जाणून घेऊया या लेखातून काजलच्या नेट वर्थबद्दल.

काजल अग्रवाल तिच्या पतीसोबत मुंबई येथे एका आलिशान घरामध्ये राहते. तिच्या घराची किंमत करोडोंमध्ये आहे. याशिवाय मुंबईमध्ये तिचं माहेर देखील आहे जिथे तिचा जन्म झाला. विशेष म्हणजे तिने तिच्या करिअरला सुरुवात इथूनच केली. काजलने या घराचा कोपरा ना कोपरा आपल्या हाताने सजवला आहे.

काजलचं मानधन
काजलला बॉलिवूडमध्ये जरी यश आलं नसेल, तरी देखील ती साऊथची प्रसिद्ध स्टार आहे. काजल तिच्या चित्रपटासाठी तब्ब्ल एक ते दोन कोटी रुपये मानधन घेते.

काजल अग्रवालचा गाड्यांचा संग्रह
काजल मोठमोठ्या गाड्यांची शौकीन आहे. ती वाहनांची मोठी चाहती असून, तिच्याकडे गाड्यांचा चांगला संग्रह आहे. काजलकडे मिनी कूपर, ऑडी या सारखी 3 लक्झरी गाड्या आहेत. तिच्या या वाहनांची किंमत 3 कोटींहून अधिक आहे.

काजलचं नेट वर्थ पाहायला गेलं, तर ती एका वर्षात 14 कोटी रुपय कमावते. काजलच्या उत्पन्नात चित्रपटांव्यतिरिक्त जाहिरातींचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, काजलची एकूण संपत्ती 66 कोटी रुपये आहे.(entertainment south actress kajal aggarwal lifestyle netwrorth cars collection)

अधिक वाचा-
आदिपुरुषची ‘जानकी’ सार्वजनिक ठिकाणी करत होती स्मोकिंग, क्रिती सेनाॅने सांगितला ‘तो’ किस्सा
मोनालिसाच्या ‘त्या’ अंधारातील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले…

हे देखील वाचा