Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड एनसीबीने रिया चक्रवर्तीविरुद्ध न्यायालयात दाखल केले आरोप, ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

एनसीबीने रिया चक्रवर्तीविरुद्ध न्यायालयात दाखल केले आरोप, ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) प्रकरणातील अंमली पदार्थाच्या कोनातून तपास करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शोविक आणि इतरांना मुख्य आरोपी सांगितले आहे. आता या प्रकरणी एनसीबीने विशेष न्यायालयात अभिनेत्री रिया, तिचा भाऊ शोविक आणि इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने रिया आणि इतरांवर सुशांत सिंग राजपूतसाठी अंमली पदार्थ खरेदी केल्याचा आरोप केला आहे.

विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी हा मसुदा आरोपपत्र दाखल करताना म्हटले आहे की, रिया चक्रवर्ती आणि शोविक यांनी ड्रग्जचा वापर केला होता आणि सुशांत सिंग राजपूतसाठी त्याची खरेदी केली होती. त्यांनी असेही म्हटले आहे की, न्यायालय सर्व आरोपींवर आरोप निश्चित करणार होते. परंतु काही आरोपींनी दोषमुक्तीचे अर्ज दाखल केले असल्याने तसे होऊ शकले नाही. (ncb files draft charges against rhea chakraborty)

१२ जुलै रोजी सुनावणी होणार
जोपर्यंत डिस्चार्ज अर्जावर निर्णय होत नाही, तोपर्यंत आरोप निश्चित करता येणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. बुधवारी झालेल्या कारवाईदरम्यान रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती न्यायालयात हजर होते. विशेष न्यायाधीश व्ही जी रघुवंशी आता १२ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहेत.

एक महिना तुरुंगात राहिली अभिनेत्री
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर, रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. जवळपास एक महिना तुरुंगात राहिल्यानंतर रियाला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. १४ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करत आहे, परंतु एजन्सी अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा