Thursday, June 1, 2023

सुशांतच्या पुण्यतिथीला रिया चक्रवर्ती झाली भावुक, रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली, ‘मला रोज…’

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) याच्या मृत्यूला आज मंगळवारी (१४ जून) रोजी २ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याच्या पुण्यतिथीनिमित्त अनेकजण सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करून त्याच्या आठवणीला उजाळा देत आहेत. अशातच त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea chakraborty) हिने देखील सुशांत सोबतचे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.. सुशांत आणि रियाच्या रोमँटिक आणि मजेदार क्षणांची झलक दिसत आहे. तुम्हाला सांगतो की, सुशांत आयुष्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत रियासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

रिया चक्रवर्तीने सुशांतसोबतच्या सुट्टीतील काही रोमँटिक क्षणांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत त्यावेळी एकमेकांना डेट करत होते. या फोटोमध्ये रिया सुशांतला किस करताना दिसत आहे.

या फोटोमध्ये सुशांत सिंग राजपूतने रिया चक्रवर्तीला आपल्या मांडीवर घेतल्याचे दिसत आहे. दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना रिया चक्रवर्तीने एक लहान पण हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे. त्याने लिहिले, “रोज तुझी आठवण येते…”

रिया चक्रवर्तीच्या या पोस्टवरून सुशांत आणि रिया नात्यात खूप आनंदी असल्याचे दिसून येते. आणि सुशांत गेल्यानंतर रियाला त्याची रोज आठवण येते. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि पैसे हडप केल्याचा आरोप केला होता.

रिया चक्रवर्तीने जवळपास एक महिना तुरुंगात काढला होता. २८ दिवस तुरुंगात काढल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. सुशांतसाठी ड्रग्ज आणल्याप्रकरणी रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा