Friday, April 26, 2024

सुशांतच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात रिया चक्रवर्तीला दिलासा, न्यायालयाने दिली परदेश प्रवासाची परवानगी

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी (१ जून) आयफा अवॉर्ड शोमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी दिली. यासोबतच विशेष न्यायाधीश ए.ए.जोगळेकर यांनी रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट तिच्याकडे सोपवण्याचे निर्देश नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) दिले आहेत. २ ते ५ जून दरम्यान होणाऱ्या IIFAच्या २२व्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री अबू धाबीला जाणार आहे.

अटीसह जामीन मंजूर
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने रियाला एक लाख रुपयांचा अतिरिक्त रोख जामीन देण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, प्रवासादरम्यान कोणत्याही अटींचे पालन न केल्यास तिचा जामीन रद्द करण्यात येईल, असेही न्यायालयाने तिला बजावले आहे. कोर्टाने रिया चक्रवर्तीवर अनेक अटी घातल्या, जसे की ती दररोज अबुधाबीमधील भारतीय दूतावासात हजर राहून तिची उपस्थिती दर्शवेल. एनसीबीला तिच्या वेळापत्रकाची माहिती देईल आणि भारतात परतल्यावर तिचा पासपोर्ट पुन्हा एनसीबीला देईल. (rhea chakraborty will attend iifa 2022 after a special court granted permission)

 

रिया चक्रवर्तीचे वकील निखिल मानेशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, अभिनेत्रीला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (आयफा) च्या संचालकांनी ग्रीन कार्पेटवर चालण्यासाठी, पुरस्कार सादर करण्यासाठी आणि संवादाचे आयोजन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुढे, अभिनेत्रीच्या वकिलाने सांगितले की, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीच्या अभिनय कारकिर्दीवर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे तिला या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
या प्रकरणी रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. अटकेनंतर जवळपास महिनाभरात मुंबई उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. रिया चक्रवर्ती व्यतिरिक्त, तिचा भाऊ शोईक चक्रवर्ती आणि इतर अनेकांवर देखील ड्रग्जचे कथित सेवन, ताबा आणि वित्तपुरवठा या प्रकरणात आरोपी म्हणून आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश जामिनावर बाहेर आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा