Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड Shamshera। वडिलांच्या आठवणीत भावूक झाला रणबीर कपूर; म्हणाला, ‘…माझे वडील जिवंत असते’

Shamshera। वडिलांच्या आठवणीत भावूक झाला रणबीर कपूर; म्हणाला, ‘…माझे वडील जिवंत असते’

येत्या २२ जुलै रोजी बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणजेच रणबीर कपूर याचा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्यांदाच रणबीर एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. रणबीरचा हा पहिला ऍक्शन सिनेमा असेल. त्याच्या या सिनेमाचं नाव ‘शमशेरा’ असून यातील त्याचा लूक समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याच्या चाहत्यांमुळे रणबीरदेखील खुश असेल. मात्र, त्याचा हा आनंद त्याचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याशिवाय अपूर्ण आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी त्याचे वडील या जगात नसल्याचे दु:ख त्याला सतावत आहे.

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने आपल्या कारकीर्दीत अधिकतर सामान्य भूमिका साकारल्या आहेत. ज्यामध्ये त्याची प्रतिमा ही ‘चॉकलेट बॉय’ किंवा आपल्याच धुंदीत असणाऱ्या मुलाची दाखवली आहे. मात्र, ‘संजू’ या सिनेमानंतर त्याच्या प्रतिमेत बदल झाला होता. आता तो ऍक्शन हिरो बनण्यासाठी सज्ज झाला आहे. यादरम्यान त्याने आपल्या वडिलांची आठवण काढली आहे. सोबतच त्याने विश्वास व्यक्त करत म्हटले की, जर वडील ऋषी कपूर (Rishi Kapoor) हयात असते, तर त्याला ‘शमशेरा’ लूकमध्ये पाहून नक्कीच खुश झाले असते. कारण, त्यांना नेहमीच असं वाटायचं की, मुलाने अशी भूमिका साकारावी, जी देशाच्या प्रत्येक प्रेक्षकाशी जोडलेली असावी.

रणबीर कपूरने वडिलांच्या आठवणीत म्हटले की, “शमशेरा सिनेमा पाहण्यासाठी माझे वडील या जगात पाहिजे होते. त्यांना एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली, तर ते आपल्या मताशी प्रामाणिक राहायचे. विशेषत: माझ्या कामाशी. मात्र, हे पाहण्यासाठी ते माझ्या सोबत नाहीत, याचे दु:ख आहे.”

‘शमशेरा’ (Shamshera) या बहुप्रतिक्षित सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर रणबीर कपूर याने या सिनेमात एका डाकूची भूमिका साकारली आहे. दुसरीकडे, अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा प्रेक्षकांचा थरकाप उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. सिनेमात तो इंग्रज जनरल पोलीस अधिकारी शुद्ध सिंग याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा यांनी केले आहे. रणबीर आणि संजय दत्तव्यतिरिक्त या सिनेमात वाणी कपूरदेखील मुख्य भूमिकेत असेल.

रणबीर कपूरने यापूर्वी २०२२मध्ये आलेल्या ‘शर्माजी नमकीन’ या सिनेमात आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काम केले होते. त्यापूर्वी त्याने २०१८मध्ये आलेल्या ‘संजू’ या सिनेमात काम केले होते. यामध्ये तो संजय दत्तच्या भूमिकेत होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा