Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड केकेच्या टीमच्या बचावात पुढे आली गायकाची मुलगी, द्वेष पसरवणाऱ्यांना केली ‘ही’ खास विनंती

केकेच्या टीमच्या बचावात पुढे आली गायकाची मुलगी, द्वेष पसरवणाऱ्यांना केली ‘ही’ खास विनंती

केकेची (Kk) मुलगी तामरा हिने गायकाचे संघ व्यवस्थापक हितेश भट्ट आणि शुभम भट्ट यांच्या बचावात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लोकांना त्यांच्याविरुद्ध द्वेष पसरवू नये, असे आवाहन केले आहे. तामराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिवंगत गायक केकेचा जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या टीमचे सदस्यही दिसत आहेत. तामराने या फोटोंसोबत एक लांबलचक नोटही शेअर केली आहे.

केके टीमने मागितली माफी
फोटो शेअर करत तामराने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला या फोटोतील सर्व लोकांचे आभार मानायचे आहेत. कारण की त्यांनी बाबांसोबतच्या त्यांच्या सर्व प्रवासात त्यांना संस्मरणीय बनवले आणि त्यांनी त्यांच्या शोमध्ये महत्त्वपूर्ण योगदाना दिले. मी हितेश अंकलला म्हणाले, आई, नकुल आणि मी शेवटच्या क्षणी वडिलांसाठी तिथे नव्हतो, निरोप सुद्धा घेता आला नाही, पण ते सोबत होते म्हणून आम्ही सगळे खूप आनंदी होतो. जेव्हापासून ते वडिलांसोबत मिसळले, तेव्हापासून त्यांचा ताण दूर झाला.” (kk daughter taamara defends late singer team)

इथे पाहा ती पोस्ट

द्वेष पसरवणाऱ्यांना केली विनंती
पुढे तामराने लिहिले, “मी हेट मेलबद्दल ऐकले आहे आणि हितेश अंकल आणि शुभम अंकल यांच्याबद्दल खूप राग व्यक्त केला जात आहे. तुमच्यापैकी जे या प्रकारचे गैरवर्तन करत आहेत त्यांच्यासाठी, स्वतःला विचारा जर ते (केके) हे पाहू शकत असतील, तर काय विचार करतील?” याशिवाय, केकेच्या मुलीने अनेक गोष्टी लिहिल्या आहेत आणि त्याच वेळी तिने केकेच्या टीमला तिचे कुटुंब असल्याचे सांगून, कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन थांबवण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा