बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके (KK) आता या जगात नाही. केके यांचे ३१ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या ६ दिवसांनंतरही त्यांचा प्रत्येक चाहता त्यांची आठवण करून भावूक होत आहे. त्याचदरम्यान आज केकेचे शेवटचे गाणे रिलीझ झाले आहे. मृत्यूपूर्वी, केकेने सृजित मुखर्जी यांच्या ‘शेरदिल’ चित्रपटासाठी त्यांचे शेवटचे गाणे गायले होते, जे आज चाहत्यांमध्ये प्रदर्शित झाले आहे.
हे गाणे गुलजार साहब यांनी लिहिले असून पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), नीरज काबी (Neeraj Kabi) आणि सयानी गुप्ता (Sayani Gupta) यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. १२ एप्रिल रोजी केकेने रेकॉर्डिंग स्टुडिओमधील काही फोटोही त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते, ज्यामध्ये ते गुलजार साहब आणि सृजित मुखर्जीसोबत दिसत होते. केकेचे हे गाणे चाहत्यांच्या हृदयाला भिडणार असल्याचे, सृजित मुखर्जी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. आता हे गाणे ऐकून आणि केकेची आठवण करून चाहतेही भावूक झाले आहेत. पंकज त्रिपाठी अभिनित सृजित मुखर्जीचा हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. (kk last song dhoop paani bahne de release watch video)
३१ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने केके यांचे निधन झाले. त्यावेळी केके कोलकाता येथे कॉन्सर्ट करण्यासाठी गेले होते. त्या दिवशी गायकाने गुरुदास कॉलेजसाठी नजरूल मंचावर परफॉर्म केले. परफॉर्म करत असताना केकेची तब्येत ढासळू लागली, पण ते परफॉर्म करत राहिले. यादरम्यान त्यांनी अनेकवेळा गरमीची तक्रारही केली. कार्यक्रमानंतर केके जेव्हा त्यांच्या हॉटेलमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांची तब्येत खराब झाली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूबाबत विविध सिद्धांत मांडले जात होते, मात्र नंतर पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर केकेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. केके यांच्या पार्थिवावर मुंबईतील वर्सोवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा