Friday, February 13, 2026
Home बॉलीवूड अक्षय-आमिरला टक्कर देण्यासाठी सज्ज झालाय साऊथचा ‘हा’ सुपरस्टार, बॉलिवूडसाठी बनला नवी डोकेदुखी

अक्षय-आमिरला टक्कर देण्यासाठी सज्ज झालाय साऊथचा ‘हा’ सुपरस्टार, बॉलिवूडसाठी बनला नवी डोकेदुखी

११ ऑगस्ट रोजी बॉलिवूडच्या दोन बड्या स्टार्सची टक्कर होणार असल्याची चर्चा होती, मात्र आता यात दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमच्या (Vikram) एंट्रीने त्रिकोण तयार झाला आहे. आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होत आहेत. हे वर्ष बॉलिवूडसाठी चांगले गेले नाही. तर दाक्षिणात्य सिनेमांनी हिंदी चित्रपटांना मागे टाकून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

अशा परिस्थितीत ११ ऑगस्टला दोन्ही चित्रपटगृहात एन्ट्री मारायच्या तयारीत असताना, साऊथच्या विक्रमचा चित्रपट दोघांसमोर आव्हान बनला आहे. आमिर आणि अक्षयच्या चित्रपटासोबतच विक्रमचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कोब्रा’ही त्याच दिवशी प्रदर्शित होत आहे. अक्षय किंवा आमिर दोघांचाही चित्रपट अपयशी ठरला, तर त्याचा थेट फायदा ‘कोब्रा’ला मिळू शकतो. वर्षाच्या सुरुवातीला रणवीर सिंग (Ranveer Singh) स्टारर ‘८३’ कमकुवत झाल्याचा फायदा अल्लू अर्जुन (Allu Arjun) स्टारर ‘पुष्पा’ला मिळाला. (vikram film kobra releasing on this day)

विक्रमचा ‘कोब्रा’ हा अ‍ॅक्शनने भरलेला थ्रिलर आहे. २०१९ मध्ये सुरू झालेला हा चित्रपट आता पूर्ण झाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या विक्रमचा हा ५८वा चित्रपट आहे. ‘केजीएफ’मध्ये दिसलेली श्रीनिधी शेट्टी (Srineedhi Shetty) देखील या चित्रपटात आहे. तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदीमध्ये हा चित्रपट संपूर्ण भारतात एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.

आमिर-अक्षयच्या चित्रपटांमध्ये विक्रमचा चित्रपट उत्तर भारतात किती चित्रपटगृहे मिळवू शकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हिंदी प्रेक्षकांना ‘आय’ लक्षात असेलच. या चित्रपटाने उत्तर भारतात चांगली कमाई केली होती. याशिवाय उत्तरेत विक्रमचा ‘अन्नियन’ही खूप पाहिला गेला. अशा परिस्थितीत उत्तर भारतातील प्रेक्षकांमध्ये विक्रमला फॅन फॉलोइंग नाही, असे म्हणता येणार नाही. ‘कोब्रा’च्या रिलीजसमोर साऊथमध्ये आमिर-अक्षयच्या चित्रपटांवर परिणाम होऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा