Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

TMKOC | ‘टप्पू’नेही मध्येच सोडला शो? ‘या’ कलाकाराने उघडली अनेक गुपितं

सुपरहिट टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘मध्ये (Taarak Mehta Ka Ooltaah Chashmaah) एकीकडे नवीन ‘नट्टू काका’ची एन्ट्री होत आहे. दुसरीकडे, या शोमधील टप्पू हे पात्र शो सोडणार असल्याची अटकळ आहे. शोच्या सेटवरून नुकतीच एक चकित करणारी बातमी समोर आली आहे.

खरं तर, टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकटने (Raj Anadkat) हा शो मध्येच सोRaj डल्याचे वृत्त आहे. गेल्या एक महिन्यापासून तो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे शूटिंग करत नाहीये. मात्र, निर्मात्यांनी शो सोडल्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (is raj anadkat quit tmkoc show)

पण मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, टप्पूच्या भुमिकेसाठी निर्मात्यांनी ऑडिशन्स सुरू केले आहेत. बऱ्याच दिवसांपासून राजने या शोला अलविदा केल्याच्या बातम्या येत आहेत. एवढेच नाही, तर त्याच्यासोबत मुनमुन दत्ताचे (Munmun Dutta) नावही जोडले जात. शोमधून या दोघांच्या बाहेर पडल्याच्या अनेक अफवा पसरल्या जात आहेत.

‘भिडे’ ही प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेता मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) यांनी राजच्या शो सोडल्याच्या बातमीवर गुपिते उघड केली आहेत. ते म्हणाले, “राजने शो सोडला आहे की नाही हे माहीत नाही. पण गेल्या काही दिवसांपासून तो शोसाठी शूटिंग करत नाही. मी स्वत: त्याला सेटवर पाहिलेले नाही. त्याला काही तब्येतीच्या समस्या होत्या.”

२०१७मध्ये या शोमध्ये टप्पूच्या भूमिकेत भव्य गांधीची (Bhavya Gandhi) जागा राज अनादकटने घेतली होती. या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांनाही तो आवडला होता. दरम्यान हा हिट टीव्ही शो नवीन पात्रांच्या प्रवेशामुळे आणि बदलीमुळे सतत चर्चेत आहे. दुसरीकडे नवीन नट्टू काका या शोमध्ये एन्ट्री घेत आहेत. गुजराती थिएटर कलाकार किरण भट्ट ही भूमिका साकारणार आहेत. खुद्द निर्मात्यानेही या बदलीवर शिक्कामोर्तब केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा