Tuesday, April 16, 2024

TMKOC | शो सोडण्यावर शैलेश लोढा यांनी तोडले मौन, उत्तर जाणून चाहत्यांनाही वाटेल आश्चर्य

गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ (Taarak Mehta Ka Ooltaah Chashmah) हा शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. एकीकडे चाहते या शोमध्ये दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून शोमधील आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा शैलेश लोढा (Shailesh Lodha) या शोमधून बाहेर पडल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी शैलेश लोढा यांनी या बातम्यांबाबत मौन तोडले आहे.

परतीच्या प्रश्नावर दिलं ‘हे’ उत्तर
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये शैलेश लोढा दिसणार की नाही, याचे उत्तर फक्त शैलेश लोढाच देऊ शकतात. अलीकडेच शैलेश त्यांच्या आगामी शो ‘वाह भाई वाह’च्या प्रमोशनसाठी आले होते. यादरम्यान अभिनेत्याला शोमध्ये परतण्याबद्दल प्रश्न विचारला गेला. प्रत्युत्तरात शैलेश असे काही बोलले, ज्यामुळे चाहते आणखीनच गोंधळून गेले. यावर शैलेश लोढा म्हणाले, “आज आम्ही वाह भाई वाहसाठी आलो आहोत, म्हणून आपण फक्त त्याच्याबद्दलच बोलू.” (shailesh lodha finally break silence on leaving tmkoc)

शैलेश लोढा यांच्या या उत्तरावरून त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो सोडला आहे की, नाही हे स्पष्ट होत नाही. पण या शोमध्ये अनेक दिवसांपासून अभिनेता दिसले नाही, हे नक्की. अशा परिस्थितीत ते शो सोडण्याच्या वृत्तावर नक्कीच शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. मात्र, याबद्दल अभिनेत्याकडून किंवा निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

लवकरत दिसणार नवी दयाबेन
दरम्यान, शोचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेनच्या शोमध्ये परतण्यास मान्यता दिली आहे. मात्र या शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिशा वकानी (Disha Vakani) नसून, एक नवीन अभिनेत्री ही भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे नव्या दयाबेनच्या शोधासाठी ऑडिशन्सही सुरू झाल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा