TMKOC | शोमध्ये राखी विजन बनणार ‘दयाबेन’? पोस्ट शेअर करत सांगितले व्हायरल बातमीचे सत्य

तारक मेहता का उल्टा चष्मा‘ (Taarak Mehta Ka Ooltaah Chashmah) ही एक लोकप्रिय टीव्ही मालिका आहे. अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) साकारलेल्या या मालिकेतील दयाबेन या लोकप्रिय पात्राची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. पण प्रेग्नेंसीनंतर दिशाने या शोचा निरोप घेतला होता आणि याला आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. दरम्यान टीव्ही अभिनेत्री राखी विजन (Rakhi Vijan) दयाबेनच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या बातमी व्हायरल होत आहेत.

राखी विजनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने व्हायरल होत असलेल्या सर्व बातम्यांचे खंडन केले आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने एका फॅन पेजद्वारे बनवलेला कोलाज शेअर केला आहे. कोलाजमध्ये एका बाजूला दिशा वकानीचा फोटो आहे आणि दुसऱ्या बाजूला राखी विजनचा फोटो आहे. यात खाली लिहिले आहे, ‘राखी विजन ही तारक मेहताच्या शोची नवीन दयाबेन आहे.” (rakhi vijan reaction on rumours about that she entry as dayaben in the show)

View this post on Instagram

A post shared by Rakhi Vijan (@rakhivijan)

या पोस्टसोबत राखीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्वांना नमस्कार, ही बातमी अफवा आहे. ज्यामुळे मी आश्चर्यचकित झाले. मला चॅनल किंवा निर्मात्यांनी संपर्क केला नाही.” मात्र, राखीच्या या पोस्टने चाहत्यांची मनं तुटली आहेत. शोमध्ये चाहते दयाबेनची वाट पाहत आहेत आणि दयाबेनच्या रुपात राखी विजनला पाहणे चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नव्हते. पण आता ते होणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Vijan (@rakhivijan)

राखी विजनच्या या पोस्टवर चाहते सतत कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले, “तू कमाल आहेस, पण तरीही स्पष्टीकरणासाठी धन्यवाद.” दुसरा म्हणाला, ‘अरे देवा, पण तुला संपर्क साधला तर कर.” त्याचप्रमाणे एका युजरने लिहिले की, “पण तुच खऱ्या दयाबेनची जागा घेऊ शकते.” अनेक यूजर्सनी तिचे अभिनंदनही केले आहे.

हेही वाचा

Latest Post