चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) मंगळवारी (५ जुलै) पूरग्रस्त मदतीसाठी आसामच्या मुख्यमंत्री मदत निधीला १1 लाख रुपयांची देणगी दिली. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर करणचे कौतुक करत ही बातमी शेअर केली आहे.
अर्जुन कपूर, रोहित शेट्टी, सोनू निगम अशा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी यासाठी योगदान दिले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, “मुख्यमंत्री मदत निधीसाठी ११ लाख रुपयांचे योगदान दिल्याबद्दल चित्रपट निर्माता @karanjohar आणि धर्मा प्रॉडक्शनचे आभारी आहोत.” (karan johar donates for assam flood relief)
Grateful to film producer Shri @karanjohar and Dharma Productions for contributing ₹11 lakh to CM Relief Fund.
Also acknowledge Shri Rohit Shetty for his initiative of getting the entire Indian film industry together for the cause of #AssamFloods.@iamrohitshetty
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) July 5, 2022
यापूर्वी, रोहित शेट्टी आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनी सीएमआरएफला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली होती. चित्रपट आणि संगीत निर्माता आणि टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांनी ११ लाख रुपयांचे योगदान दिले, तर गायक सोनू निगमने पूरग्रस्त मदत आणि पुनर्वसनासाठी मदत म्हणून ५ लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीला दिले.
करण एका वर्षांनंतर त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाकडे परत येत आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन, रणवीर सिंग आणि आलिया यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी रिलीझ होणार आहे. २०१६ मध्ये आलेला ‘ए दिल है मुश्किल’ हा त्याचा शेवटचा दिग्दर्शकीय चित्रपट होता.
तसेच, तो त्याच्या लोकप्रिय टॉक शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनची तयारी करत आहे. करणने टॉक शोमधून शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग आहेत, जे पहिल्या एपिसोडमध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त, अक्षय कुमार, अनिल कपूर, वरुण धवन, जान्हवी कपूर, सारा अली खान, विजय देवरकोंडा, समंथा रूथ प्रभू, शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी ही काही प्रमुख नावे या सीझनमध्ये आग लावणार आहेत. हा शो ७ जुलै रोजी प्रसारित होईल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा