सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील गोंडस जोडपं म्हणून ओळखलं जात होती. मागील वर्षी २ ऑक्टोबर रोजी या जोडप्याने घटस्फोटाचा निर्णय घेत चाहत्यांसोबतच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. आता त्यांचे नाते संपले असून ते वेगळे झाले आहेत. मात्र, तरीही त्यांच्याबद्दल चर्चा ही नेहमीच रंगलेली असते. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. अभिनेत्रीने तिच्या नात्याविषयी मोकळेपणाने चर्चा केली नाही. मात्र, आता तिने वैवाहिक आयुष्य दु:खी का असते हे प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याच्यापुढे सांगितले आहे.
समंथा आणि नागाने बाहेर केले नाही घटस्फोटाबाबत वक्तव्य
समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘पुष्पा’तील ‘ओ अंटावा’ या गाण्यामुळे तिच्या प्रसिद्धीत मोलाची भर पडली आहे. अभिनेत्रीने घटस्फोटाच्या घोषणेनंतर मोकळेपणाने चर्चा केली नव्हती. तसेच, नागा चैतन्य (Naga Chaitanya) यानेदेखील बाहेर कधीही आपल्या घटस्फोटाबाबत चर्चा केली नाही.
कॉफी विथ करण सिझन ७मध्ये घेणार सहभाग
मात्र, आता अभिनेत्री ‘कॉफी विथ करण सिझन ७’मध्ये सहभाग घेताना दिसणार आहे. याचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्रीने वैवाहिक आयुष्याबाबत चर्चा केली आहे. या प्रोमोमध्ये समंथा करण जोहर (Karan Johar) याच्या सिनेमाचे नाव घेत म्हणाली की, “दु:खी वैवाहिक जीवनाचे कारण तुम्हीच असता. तुम्ही आयुष्याकडे ‘कभी खुशी कभी गम’ म्हणून पाहता, पण खरे आयुष्य ‘केजीएफ’ सारखे असते.” समंथा असे म्हणताच करणदेखील स्वत:ला हसू लागतो.
View this post on Instagram
समंथाच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘काथुवाकुला रेंदु काधळ’ या तमिळ सिनेमात झळकली होती.
याव्यतिरिक्त ‘कॉफी विथ करण ७’बद्दल बोलायचं झालं, तर या शोच्या प्रोमोमध्ये इतर पाहुण्यांचीही झलक दाखवण्यात आली आहे, जे या सिझनमध्ये येणार आहेत. खास बाब म्हणजे, या शोमध्ये यंदा आलिया भट्ट, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सारा अली खान, जान्हवी कपूर, समंथा रुथ प्रभू, अनन्या पांडे, शाहिद कपूर, रणवीर सिंग, अनिल कपूर आणि वरुण धवन दिसणार आहेत.