Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

व्हिडिओ। एवढी क्रेझ तर बॉलिवूड अभिनेत्रींचीही नाही दिसणार, पाहा सपनाच्या ठुमक्यांसाठी जमलेली चाहत्यांची गर्दी

‘हरियाणवी क्वीन’ या नावाने प्रसिद्ध असलेली डान्सर आणि अभिनेत्री म्हणजे सपना चौधरी होय. आधी छोट्याशा भागापुरती मर्यादित असणाऱ्या सपनाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर बिग बॉस सेलिब्रिटी आणि नंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रवास केला. तिच्या डान्स कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करत असतात. हे डान्स कार्यक्रम इतके हिट होतात की, बॉलिवूड अभिनेत्रीही तिच्यासमोर फिक्या पडतात. सपनाचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. त्यामुळे तिचा कोणताही व्हिडिओ येताच, काही मिनिटातच हिट झाल्याशिवाय राहत नाही. आता तिचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

सपना चौधरी (Sapna Choudhary) हिचे एक गाणे युट्यूबवर धमाल करत आहे. तिच्या गाण्याचे नाव ‘पानी लावे निक्कर निक्कर’ (Panni Lawe Nikkar Nikkar) असे आहे. या गाण्याला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. गाण्यात सपना नेहमीप्रमाणे आपल्या जुन्या अंदाजात दिसत आहे.

आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या काळजात घंटी वाजवणारी सपना जसा डान्स करण्यास सुरुवात करते, तसे प्रत्येकजण मोबाईलचा फ्लॅश सुरू करतात. तसेच, सपनाच्या डान्सचा व्हिडिओ तयार करू लागतात. या गाण्यात सपनाने शानदार मूव्हज दाखवले आहेत. हा डान्स व्हिडिओ पाहून कोणीही स्वत:ला डान्स करण्यापासून रोखू शकत नाहीये.

सपनाच्या या व्हिडिओला युट्यूबवर ५१ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, शेकडो लाईक्सही मिळाले आहेत. या गाण्यात प्रेक्षकांना सपनाचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहेत. व्हिडिओतील सपनाची एनर्जी पाहण्यासारखी आहे. सपना ज्याप्रकारे यशाच्या पायऱ्या चढत आहे, तशा तिच्या चाहत्यावर्गात वाढ होतच आहे. सपनाचे हे गाणे मासूम शर्मा आणि शीनम यांनी गायले आहे. तसेच, गाण्याचे बोल राजेश सिंघपुरिया यांनी लिहिले आहेत.

सपनाबद्दल थोडंसं
‘बिग बॉस’मध्ये भाग घेतल्यानंतर सपनाने स्टेज शोसोबतच व्हिडिओ अल्बममध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिच्या कामासाठी तिला नावाजले गेले. सपनाने ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केले होते. यानंतर ती ‘वीरे की वेडिंग’ आणि ‘नानू की जानू’ या गाण्यांमध्येही झळकली. पुढे तिला ‘बैरी कंगना- ०२’ या भोजपुरी सिनेमातही काम करण्याची संधी मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मोठ्या नुकसानीमुळे कैलाश खेर निघालेले जीव द्यायला, पण साधू-संतांच्या सहवासाने पुन्हा पकडली यशाची एक्सप्रेस

कैलाश खेर आहेत शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यापेक्षाही जास्त श्रीमंत, कधीकाळी चप्पलही घ्यायला नसायचे पैसे

पंधरा वर्षाची असताना ‘या’ प्रसिद्ध गायकाने श्वेता पंडितवर केले होते लैंगिक अत्याचार? वाचा ‘ती’ घटना

हे देखील वाचा