Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील लाडका अभिनेता का जातोय २१ दिवस सुट्टीवर? मोठं कारण आलं समोर

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने कमी कालावधीत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. यात अनेद दिग्गज कलाकार काम करताना दिसले आहेत. पण आता या मालिकेत विश्वजीत काकांची भूमिका निभावणारा अभिनेता आनंद काळे काही दिवस मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचे समजत आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते कोल्हापूर ते काश्मीर लेह-लडाख अशा प्रवासाला बाईकवरून जाणार आहेत. त्यांना बाईकची प्रचंड आवड असून असा प्रवास करण्याचे स्वप्न होते. त्याचमुळे ते २१ दिवस हा ७००० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anand Kale Andy (@aanandkale)

याच कारणामुळे ते मालिकेतूनही ब्रेक घेणार असल्याची चर्चा आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा