Monday, August 4, 2025
Home टेलिव्हिजन राखीला दमच नाही! ‘ड्रामा क्वीन’ने करून टाकली अंकिताच्या प्रेग्नंसीची पोलखोल, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

राखीला दमच नाही! ‘ड्रामा क्वीन’ने करून टाकली अंकिताच्या प्रेग्नंसीची पोलखोल, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

सिनेसृष्टीतून आनंदाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आधी अभिनेत्री आलिया भट्ट हिने सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या प्रेग्नंसीची माहिती दिली. यामुळे सिनेसृष्टीतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अशात आता टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही आई बनणार असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, अंकिताचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे. तिचे हे फोटो व्हायरल झाल्याने चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, असा दावा केला जात आहे की, अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande Pregnant) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) लवकरच त्यांच्या पहिल्या अपत्याचे स्वागत करणार आहेत. अंकिताची जवळची मैत्रीण राखी सावंत (Rakhi Sawant) हिने माध्यमांशी बोलताना या आनंदाच्या बातमीचा खुलासा केला. अंकिताच्या प्रेग्नंसीवर विचारलेल्या प्रश्नावर राखीने उत्तर दिले होते की, अंकिता कोणत्याही वेळी ही आनंदाची बातमी देईल.

राखी म्हणाली की, “आनंद आहे. अंकिता आई बनणार आहे. अंकिता माझं तुझ्यावर प्रेम आहे. सर्वजण मला मावशी बनवत आहेत. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे अंकिता.” दुसरीकडे तिने स्वत:बद्दल बोलताना म्हटले होते की, “देवा ही संधी मला केव्हा देशील. मला हा आनंद का मिळत नाहीये?” अंकिता आणि विकी यांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केली नाहीये. मात्र, राखीच्या वक्तव्याने चाहत्यांची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

दुसरीकडे, सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये अंकिता बेबी बंपसोबत दिसत आहे. तसेच, एका फोटोत अंकिता आणि विकी यांचा रोमँटिक फोटो कोलाजही शेअर केला आहे. या फोटोला सुंदर कॅप्शन देत ‘प्रेग्नंट नाही,’ असे लिहिले आहे. म्हणजेच अंकिता प्रेग्नंट नाहीये. तिचा बेबी बंप असलेला फोटो एडिट करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हायरल भयानीच्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, “व्हिडिओमधून फोटोशॉप फोटो तयार करण्यात आला आहे. तसेच, असा दावा केला गेला आहे की, अंकिता प्रेग्नंट आहे. मात्र, हे खरे नाहीये.”

अंकिताबाबत बोलायचं झालं, तर तिने १४ डिसेंबर, २०२१ रोजी व्यावसायिक विकी जैन याच्यासोबत लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्त या जोडप्याने एकमेकांच्या सहवासात दिवस घालवला होता. तसेच, केकही कट केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मद्रास हाय कोर्टाचा विजयबाबत मोठा निर्णय, अमेरिकेतून मागवलेल्या बीएमडब्ल्यू कारशी आहे संबंध

शॉकिंग! सामान खरेदीसाठी निघालेल्या गायिकेसोबत रिक्षाचालकाकडून घृणास्पद कृत्य

वर्षाकाठी २५ कोटी छापते कॅटरिना, ‘इतक्या’ कोटींची आहे मालकीणबाई; चार वर्षे ठरलीये आशियाची मादक अभिनेत्री

हे देखील वाचा