‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा सध्या खूपच चर्चेत आहे. तो त्याच्या ‘लाल सिंग चड्ढा‘ या बहुप्रतिक्षित सिनेमामुळे माध्यमांचे लक्ष वेधून घेत आहे. तो जवळपास ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. आमिरचा हा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिरला मागील फ्लॉप सिनेमानंतर या आगामी सिनेमाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. तो सिनेमाची स्टोरी आणि गाण्याबाबत वाटणाऱ्या गोष्टी त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतो. मात्र, सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो रडताना दिसत आहे.
नुकताच आमिर खान (Aamir Khan) याने दाक्षिणात्य सुपरस्टार मित्रमंडळींसाठी ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केली होती. यावेळी त्यांनी सिनेमाची प्रशंसा करताच आमिरला अश्रू अनावर (Aamir Khan Cry) झाले.
आमिर याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आमिर खान भावूक (Aamir Khan Emotional) होताना दिसत आहे. या स्पेशल स्क्रीनिंगला चिरंजीवी, नागार्जुन, एसएस राजामौली, सुकुमार आणि नागा चैतन्य यांसारख्या दिग्गज अभिनेते यांनी हजेरी लावली होती.
Fascinating how a chance meeting & a little chat with my dear friend #AamirKhan @Kyoto airport – Japan, few years ago led to me becoming a part of his dream project #LaalSinghChaddha
Thank You #AamirKhan for the exclusive preview at my home.Heartened by your warm warm gesture! pic.twitter.com/hQYVZ1UQ5m
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) July 16, 2022
चिरंजीवी यांनी नुकताच व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्यांनी स्पेशल स्क्रीनिंगच्या खास क्षणांसोबतच सिनेमाबाबतही आपले मत व्यक्त केले. त्यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “काही वर्षांपूर्वी आपला खास मित्र आमिर खान जपानच्या क्योटो विमानतळावर भेटला होता. त्यावेळी त्याच्याशी चर्चा करून त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमाचा भाग बनलो. माझ्या घरी एक्सक्लूसिव्ह प्रीव्ह्यूसाठी मी आमिरला धन्यवाद देतो. सर्वात मोठी बाब अशी की, हा सिनेमा तू खूपच छान बनवला आहे.”
या व्हिडिओमध्ये ‘आरआरआर’ दिग्दर्शक एसएस राजामौली, सुकुमार, नागा, नागा चैतन्य आणि चिरंजीवी चर्चा करताना दिसत आहेत. सिनेमा पाहिल्यानंतर सर्वजण आमिरच्या पात्राचे आणि सिनेमाची चर्चा करत असतात, तेव्हाच आमिरला अश्रू अनावर होतात. आमिरच्या डोळ्यात पाहून चिरंजीवी त्याला मिठी मारतात.
आता चाहतेही असे म्हणत आहेत की, जर हा सिनेमा एसएस राजामौली आणि चिरंजीवी यांसारख्या दिग्गजांना आवडला आहे, तर नक्कीच सुपरहिट होईल.
आमिरबाबत बोलायचं झालं, तर तो २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या शेवटचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमात झळकला होता. यामध्ये त्याच्यासोबत महानायक अमिताभ बच्चनही मुख्य भूमिकेत होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-