Monday, June 17, 2024

डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल

भारतातील सांस्कृतीक कलांपैकी लावणी हे महाराष्ट्राराज्याचं प्रसिद्ध नृत्य आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी प्रसिद्ध लावणी कलाकर म्हणून ओळखली जाणारी गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे. प्रसिद्ध लावणीकार गौतमी पाटीलने आपल्या धमाकेदार नृत्यानं आणि दिलफेक अदाकारिने अनेक तरुनांना प्रेमात पाडल आहे. गौतमी रोज कोणत्याना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते.

सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा (Gautami Patil) प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी काहीही करायला तयार असतात. तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची फार उत्सुक्ता असते. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या वडिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यामुळे गौतमीला ट्रोल केले गेले. या दरम्यान तिची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

काही दिवसांपुर्वी गौतमीने तिच्या बालपणीता एक एक फोटों शेअर केला होता. आता गौतमीच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये गौतमीची आई दिसत आहे. व्हिडिओमध्ये गौतमीचा एक फॅन बोलताना दिसत आहे. तो म्हणतो की, ”उंबराच्या झाडाला दत्तगुरूंची सावली.. गौतमीला जन्म देणारी धन्य ती माउली”.

त्यानंतर गौतमी आईच्या जवळ जाऊन तिला प्रेमाने मिठी मारते. हा व्हिडिओमध्ये त्यांच्या दोघींमधील घट्ट नातं दिसत आहे. गौतमी मुळची धुळ्याची रहिवासी आहे. तिला खान्देशची कन्या म्हटले जाते. तिचा जन्म सिंधखेडा गावात झाला आहे. तिच्या वडिलांच गाव चोपडा आहे. तिचे वडिल दारुच्या आहारी गेले आहेत. ते तिच्या आईला मारहाण करायचे. त्यामुळे ती त्यांच्यापासून दूर राहिची. काही दिवसांपुर्वी तिच्या आईचा अपघात झाला. गौतमीची आई त्या आगोदर नोकरी करायची. पण अपघात झाल्यानंतर त्या घरीच राहु लागल्या. त्यामुळे गौतमीवर घरची जबाबदारी आली. (Gautami Patil’s video with mother goes viral)

अधिक वाचा-
“…त्या दिवसापासून दारू अशी सुटली” अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

– अभिनेत्री राखी सावंतच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री; म्हणाली,‘मी माझ्या आयुष्यात पुन्हा…’

हे देखील वाचा